बुध्दीबळ स्पर्धेत १७८ स्पर्धक सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 22:51 IST2020-01-07T22:51:12+5:302020-01-07T22:51:27+5:30

उपक्रम : जिमखाना युवा महोत्सवातर्फे आयोजन ; कोतवाल ट्रस्टचे पुढाकार

 3 contestants competing in the racket | बुध्दीबळ स्पर्धेत १७८ स्पर्धक सहभागी

Dhule

धुळे : शहरातील कोतवाल ट्रस्टच्या सभागृहात खान्देश प्रबोधिनी व एसबी उर्फ बाबासाहेब कोतवाल ट्रस्टतर्फे खान्देश जिमखाना युवा महोत्सव बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत १७८ खेळाडूंनी सहभाग घेतला होता़
मराठी बुद्धिबळ संघटना, जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन शिक्षणाधिकारी मनीष पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी अ‍ॅड. एम. एस. पाटील, ओमप्रकाश खंडेलवाल, महेंद्र जैन, अक्षय छाजेड उपस्थित होते.
स्पर्धा स्वीस लीग पद्धतीने व फिडेच्या नवीन नियमानुसार घेण्यात आली.
स्पर्धेत वेगवेगळ्या वयोगटातील १७८ खेळाडूंनी सहभाग नोंदवला. स्पर्धेतील प्रत्येक सामना रंगतदार झाला.
काही खेळाडूंची लढत त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या खेळाडूंशी झाली. तसेच काही सामने मुलांच्या विरोधात मुली असेही झाले. सर्व स्पर्धकांची एकाच वेळेस स्पर्धा झाली. योवळी मान्यवरांच्या हस्ते योगेश रवंदळे यांचा सत्कार झाला. संस्थेचे अध्यक्ष अतुल दहिवेलकर, भूपेंद्र मालपुरे, अमित गोराणे, प्रकाश पांडे, किशोर जोशी यांच्यासह खान्देश प्रबोधिनी व कोतवाल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी संयोजन केले. दरम्यान कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विविध विषयांवर आपले मनोगत व्यक्त केले होते़

Web Title:  3 contestants competing in the racket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे