लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २५ तर शिरपूर उपजिल्हा रूग्णालयातील तीन अशा एकूण २८ रुग्ण बुधवारी कोरोनामुक्त झाले. त्यात पारोळा येथील एका रुग्णाचा समावेश आहे.कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांमध्ये धुळे शहरातील १७ तर शिरपूर येथील दहा जणांचा समावेश आहे. आतापर्यंत धुळे शहरातील १०४ तर शिरपूर येथील ३६ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बुधवारी शिरपूर येथील अडीच वषार्चे बालक, २७ व ६५ वर्षीय महिलेने कोरोनावर मात केली.
शिरपूर व धुळ्यातील २८ रुग्ण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 15:43 IST