धुळे : सोमवारी जिल्ह्यातील २७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. हिरे वैद्यकीय महाविद्यालयातून २२ तर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातून पाच रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले. टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना रुग्णालयातून निरोप देण्यात आला.धुळे शहरातील १३ रुग्ण कोरोनमुक्त झाले. देवपूर परिसरातील दोन रुग्णांचा त्यामध्ये समावेश आहे. शिरपूर येथील आठ, दोंडाईचा पाच तर साक्री येथील एका रुग्णांने कोरोनावर विजय मिळविला. आतापर्यंत जिल्ह्यातील ४२० रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी २४७ रुग्ण बरे झाले आहेत तर ३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १३४ कोरोना बाधित रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
२७ रुग्णांनी केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 21:52 IST