जिल्ह्यात २५५ शिक्षकांची पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:37 IST2021-07-28T04:37:29+5:302021-07-28T04:37:29+5:30

एकीकडे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमाने गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये रिक्त पदांचे ...

255 vacant posts of teachers in the district | जिल्ह्यात २५५ शिक्षकांची पदे रिक्त

जिल्ह्यात २५५ शिक्षकांची पदे रिक्त

एकीकडे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमाने गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये रिक्त पदांचे ग्रहण आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक ८४ रिक्त पदे साक्री तालुक्यातील आहेत. त्याखालोखाल शिरपूर तालुक्यात ६५, शिंदखेडा तालुक्यात ६३ तर धुळे तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ४३ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमध्ये पदवीधर विषय शिक्षकांची संख्या सर्वात जास्त असून, रिक्त पदे त्वरित भरण्याची गरज आहे.

विषय शिक्षकांची पदे सर्वाधिक रिक्त

जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये विषय शिक्षकांची सर्वाधिक पदे रिक्त आहेत. यामुळे पाचवीच्या पुढील वर्गांना शिकविण्यात अडचणी येत असतात. विषय शिक्षकांची नियुक्ती करावी अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र त्याकडे अद्यापही लक्ष देण्यात आलेले नाही.याचा गुणवत्तेवर परिणाम होऊ लागला आहे.

सध्या जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू झालेल्या नसल्या तरी ॲानलाइन शिक्षण सुरू आहे.

शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ही बाब जि.प.सह शासनानेही गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.

अतिरिक्त शिक्षकांचेही लवकर समायोजन झाल्यास, इतर शिक्षकांवर पडणारा ताण कमी होईल. विद्यार्थ्यांनाही त्याचा लाभ होईल.

जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या टिकवून ठेवण्यासाठी विषय शिक्षकांची नियुक्ती करण्याची गरज आहे. विषय शिक्षक नसल्याने, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असतो. त्यामुळे या शिक्षकांची लवकर नियुक्ती झाली पाहिजे.

- राजेंद्र पाटील,

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विषय शिक्षक नसल्याने, चौथीच्या पुढील वर्ग बंद पडतात. विद्यार्थी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेत असतात. त्यामुळे विषय शिक्षकांची नियुक्ती होणे गरजेेचे असून, याची दखल घेतली पाहिजे.

- भूपेश वाघ,

Web Title: 255 vacant posts of teachers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.