जिल्ह्यातील उद्योग, व्यवसायाला २५ कोटींचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 12:48 IST2020-07-03T12:46:50+5:302020-07-03T12:48:26+5:30
लॉकडाऊन : अनेक उद्योग, व्यापार बंद पडण्याचा मार्गावर, राज्यशासनाकडून उद्योगांना उभारी देण्याची गरज

dhule
चंद्रकांत सोनार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात अडीच महिन्यासाठी लॉकडाऊन घोषीत करण्यात आले होते़ या अडीच महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील उद्योग, व्यापारावर मोठा परिणाम झाला असून सुमारे २५ कोटी रूपयांचा फटका उद्योजकांना सहन करावा लागला आहे़
जिल्ह्यात नरडाणा व अवधान या दोन ठिकाणी औद्यागिक वसाहती आहेत़ त्यात २८० उद्योग आहेत. या उद्योगाचा विस्तार देशभरात आहे़ राजस्थान, बिहार, उत्तरप्रदेश, महाराष्ट्रासह खान्देशातील हजारो कामगारांची उदरनिर्वाह या उद्योगावर अवलंबून आहे़ २४ मार्च रोजी शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्याने अनेकांना उद्योग, व्यापार तसेच लहान मोठे व्यवसाय तब्बल अडीच ते तीन महिने बंद होते. त्यामुळे याठिकाणी कामासाठी आलेल्या जिल्ह्यासह परराज्यातील कामगारांना आपल्या मायदेशी परत जावे लागले़ त्यामुळे ३० ते ३५ हजार कामगारांवर बेरोजगारी कुºहाड पडली आहे़ तीन महिन्यापासून ठप्प उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी थकीत विजबील, कामगारांचा पगार, जीएसटीची रक्कम, जागेचे भाडे, मशीन दुरूस्तीचा खर्च, बॅका व वित्तीय संस्थाकडून घेतलेले कर्ज अशा संकटात व्यापारी, उद्योजक सापडला आहे़े बॅकांचे हप्ते भरण्यासाठी ३ महिन्याची सवलत जरी दिलेली असली तरी मात्र थकीत तीन हप्त्याची रक्कम उद्योजकांना भरावीच लागणार आहे़ हा सर्व आर्थिक फटका भरून काढण्यासाठी व उद्योजक, व्यापाराला उभारी आणण्यासाठी शासनाकडून मदतीची अपेक्षा उद्योजकांकडून होत आहे़
नागरिकांनी खबरदारी घ्यावी
अडीच महिन्यापासून बंद असलेले उद्योग व व्यापार गेल्या जुन महिन्यापासून सुरू झाला आहे़ तो पूर्वपदावर आणण्यासाठी उद्योजकांची धडपड सुरु असताना. दुसरीकडे कोरोनाचे रुग्ण कमी होण्याऐवजी गतीने वाढत आहे. सध्यास्थितीत जिल्ह्यात १ हजार १४६ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत़ अन्य जिल्ह्याच्या तुलनेत ही संख्या कमी असली तरी नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे़
अन्यथा पुन्हा लॉकडाऊन
अनलॉकच्या कालावधीत जिल्हा प्रशासनाकडून सम-विषम तारखेनुसार व्यवसाय नियोजन करून देण्यात आले आहे़ मात्र नागरिक हे बाजारात विनाकारण गर्दी करतांना दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाबाधीतापासून संसर्ग होण्याची भीती अधिक आहे. ते टाळण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घरात बाहेर निघणे बंद केले पाहिजे. अन्यथा परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली तर शहरासह जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन घोषीत करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेतला जावू शकतो़
तसे झालेतर पूर्वपदावर येत असलेल्या उद्योग, व्यापार तसेच लहान मोठ्या व्यवसायांवर परिणाम होऊ शकतो़ तसेच अनेकांचा रोजगार पुन्हा धोक्यात येवून जिल्ह्यास बेकारी वाढून गुन्हेगारी वाढू शकते़
काय सुरू?
हॉटेल खानावळीतून घरपोच सेवेला परवानगी, तीनचाकी व चारचाकी वाहनांकरीता एक अधिक दोन व्यक्ती व दुचाकी वाहनांकरीता एका व्यक्तीला सेवेकरीताच परवानगी, मॉल्स व व्यापारी संकुल व्यतिरिक्त जिवनावश्यक वस्तू आणि सेवांची सर्व दुकाने, सर्व सलून, स्पा सेंटर, ब्यूटी पार्लर, बार्बर दुकाने सुरू राहतील
काय बंद?
सर्व प्रकारचे हॉटेल, बार, सिनेमागृहे, मॉल, व्यापारी संकुल, क्रीडा संकुले, स्वीमिंग पूल, सभागृहे, व्यायामशाळा, धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे, शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संकुल, प्रशिक्षण केंद्र, खासगी शिकवण्या, रेस्टॉरंट बार, सामाजिक, राजकीय व इतर सेवा बंद राहतील
महागाई वाढली का?
भाजीपाला : अडीच महिन्याचा लॉकडाऊननंतर व्यवहार सुरळीत झाल्याने अनेकांनी अडीच महिन्याची भर काढण्यासाठी जीवनावश्यक वस्तूसह अन्य वस्तूचे भाव वाढवून दिले आहेत़ त्यात भाजीपाला, इलेक्ट्रॉनिक वस्तू, पेट्रॉल, डिझेल तसेच भाव वाढीची मागणी देखील केली जात आहे़
किराणा : अनलॉकच्या पहिल्या मुगदाळ, तेल, खोबरे, सोयाबीन तसेच विविध खाद्य पदार्थाचे भाव वाढले आहे़ लॉकडाऊनच्या कालावधीत वाहतूक व्यवस्था बंद असल्याने अनेकांनी साठवलेला मालाची किमंती वाढविल्या आहेत़ त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कोरोना संकटाच्या काळात मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे़