शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

धुळे जिल्ह्यात ११वीसाठी २४ हजार ८४० जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 11:42 AM

विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याकडे कल, शुक्रवारपासून प्रवेश प्रक्रिया

ठळक मुद्देअनुदानित तुकड्यांमध्ये १८ हजार ९६० जागाकला शाखेच्या १२ हजार ३२० तर विज्ञान शाखेच्या ४ हजार ८४० जागा प्रवेश प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू होणार

आॅनलाइन लोकमतधुळे : नऊ दिवसांपूर्वीच दहावीचा निकाल जाहीर झालेले असून, विद्यार्थ्यांना आता महाविद्यालयीन प्रवेशाचे वेध लागले आहेत. जिल्ह्यात सर्व जिल्ह्यात अनुदानित, विनाअनुदानित स्वयंअर्थसहाय्यित अशा सर्व व्यवस्थापनाच्या कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या एकूण २४ हजार ८४० जागा आहेत. यात अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयात १८ हजार ९६० तर खाजगी, विना अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार ८८० जागा आहेत. विद्यार्थ्यांचा कल विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याकडे आहे. दरम्यान २१ पासून महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल ८ जून जाहीर झाला. परीक्षेसाठी २८ हजार ८८२ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. २८ हजार ३६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २१ हजार ६१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याची टक्केवारी ७७.११ एवढी होती.जिल्ह्यात यंदा आॅफलाइन पद्धतीनेच अकरावीची प्रवेश प्रक्रिया होणार आहे. जिल्ह्यात ११वीसाठी २२० अनुदानित तुकड्यांमध्ये तब्बल १८ हजार ९६० जागा आहेत. त्यात १२ हजार ३२० जागा कला शाखेच्या, ४ हजार ८४० जागा विज्ञान शाखेच्या, ७६० जागा वाणिज्य शाखेच्या आहेत. याशिवाय १ हजार ४० जागा संयुक्त शाखेच्या आहेत.त्याचप्रमाणे ७१ विनाअनुदानित तुकड्यांमध्ये एकूण ५ हजार ८८० जागा आहेत. त्या कला शाखेच्या १ हजार २८० जागा आहेत. विज्ञान शाखेच्या ४ हजार ३२० जागा, वाणिज्य शाखेच्या २८० जागा आहेत. 

टॅग्स :DhuleधुळेEducationशिक्षण