डाबली-धांदरणे गावाला २४ तास वीजपुरवठा करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:37 IST2021-05-19T04:37:18+5:302021-05-19T04:37:18+5:30
गावातील ग्रामपंचायतकडून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण उपविभाग नरडाणा येथील अभियंता जितेंद्र सोंजे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. सदर निवेदनावर डाबलीचे ...

डाबली-धांदरणे गावाला २४ तास वीजपुरवठा करावा
गावातील ग्रामपंचायतकडून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण उपविभाग नरडाणा येथील अभियंता जितेंद्र सोंजे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. सदर निवेदनावर डाबलीचे निवेदनात म्हटले आहे की, डाबली धांदरने गावाची वीज उपकेंद्रापासून वेगळी करून २४तास करावी. धांदरने येथे उपकेंद्र बसविण्यात आले आहे. त्याला गोराने, विटाई, वायपूर, डाबली, होळ, धांदरने, पिपरखेडा, चांदगड, सार्वे ही नऊ गावे जोडली आहे. त्यामुळे कोणत्याही एका गावात बिघाड झाला किंवा काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास तर सर्व गावांची वीज बंद केली जात असते. तसेच काम सुरू राहिल्यास ४-४ तास वीज बंद केली जाते. एका गावाच्या अडचणीमुळे पूर्ण आठ खेड्यांनाही त्रास सहन करावा लागतो.
डाबली धांदरने येथे उपकेंद्र सुरू करण्यापूर्वी जशी २४ तास वीज मिळत होती. तशीच आताही द्यावी. निवेदनावर सरपंच गुंताबाई भिल, ग्रामसेवक सुभाष रामोळे, तर धांदरनेचे सरपंच रंजिता गिरासे यांच्या सह्या आहेत. निवेदन देताना डाबलीचे उपसरपंच प्रवीण पाटील, प्रा. भय्या मंगळे, वैभव मंगळे आदी उपस्थित होते.