धरण दुरूस्तीसाठी २३ लाखांचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 15:01 IST2020-12-06T15:00:47+5:302020-12-06T15:01:11+5:30
आमदारांच्या हस्ते कामाचा शुभारंभ

dhule
पिंपळनेर : मैंदाणे ता. साक्री शिवारातील धरणदुरुस्ती पुनर्रचना मातीकाम धरण साक्री तालुक्याचे आमदार मंजुळा गावीत यांच्या अध्यक्षतेखाली भूमिपूजन करण्यात आले.
जिल्हा परिषदेतून धरणाच्या खोली, उंची, व रुंदीसाठी अंदाजे २३ लाख रुपये मंजूर झाले आहे. हे धरण मैंदाणे शिवारातील शेतकºयांना शेती, पिण्याचे पाणी, गुरांना, परिसरातील पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
धरण बांधणी भूमिपूजन कार्यक्रमास तुळशीराम गावीत, जि.प.सदस्य वसंती पवार, पं.स.सदस्य संगीता गावीत, कैलास ठाकरेआदिवासी बचाव अभियान तालुका प्रमुख गणेश गावीत, गोविंद जाधव, सरपंच सुनील चौरे, रामदास बहिरम, भुपेंद्र जाधव, भरत अहिरे, मनोज बटवाडा, चौरे भाऊसाहेब, देवा अहिरे, पिंटू चौरे, राजू चौरे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.