धुळ्यात कोरोना बाधित ५७ वर्षिय रूग्णाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 16:05 IST2020-04-21T16:04:50+5:302020-04-21T16:05:08+5:30
आरोग्य यंत्रणा सज्ज : जिल्ह्यात मृतांची संख्या झाली दोन

धुळ्यात कोरोना बाधित ५७ वर्षिय रूग्णाचा मृत्यू
धुळे : कोरोनाबाधीत रुग्ण शहरात आढळल्यानंतर आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे़ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्यांच्या सहवासातील अनेकांची तपासणीला सुरुवात झाली असतानाच मच्छिबाजारमधील एका ५७ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला़ त्याचा तपासणी अहवाल हा पॉझिटिव्ह आल्याने यंत्रणा सतर्क झाली आहे़ दरम्यान यापुर्वी साक्रीत एका वृध्दाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात कोरोनाबाधीत मृत्यू झालेल्यांची संख्या दोनवर पोहचली आहे़