२८३ मेंढपाळांची भरपाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 22:55 IST2020-02-19T22:54:53+5:302020-02-19T22:55:18+5:30
अतीवृष्टी : चार हजार मेंढ्या दगावल्या, तहसिलदारांना दिले निवेदन

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : गेल्या पावसाळ्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे धुळे तालुक्यातील नवे आणि जुने भदाणे गावांमध्ये तीन ते चार हजार मेंढ्या दगावल्या होत्या़ त्यात २८३ मेंढपाळांचे नुकसान झाले़
नुसान भरपाई मिळावी यासाठी मेंढपाळांनी शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्या नेतृत्वाखाली तहसिलदारांची भेट घेवून निवेदन दिले़ निवेदनात म्हटले आहे की, अतीवृष्टीमध्ये मेंढ्या दगावल्याच्या वेळोवेळी घटना घडल्या़ प्रशासनाने पंचनामे केले़ परंतु पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शवविच्छेदन केले नाही़ प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे मेंढपाळांना नुकसान भरपाई मिळण्यास अडचणी येत आहेत़ प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका सामान्य मेंढपाळांना सहन करावा लागत आहे़ हा प्रश्न शिवसेनेने हाती घेतला असून मेंढपाळांवरील अन्याय दूर करुन मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली आहे़ निवेदनावर धनराज पाटील, सुदर्शन पाटील, विलास चौधरी, युवराज खताळ, बापू माळचे, केशव गांगुर्डे, भिमराव गोयकर, गंगाराम मारनर, धनराज सरगर, शालीक गोयकर, गोकुळ खताळ, कृष्णा खताळ, बकाराम मारनर, रामा गोयकर, धनराज कारंडे, बोगु श्रीराम, कैलास खताळ, जिभाऊ खैरनार, बारकु मारनर, भिमा सरग, नारायण मारनर आदींच्या सह्या आहेत़