जिल्ह्यात १९ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:30 IST2021-01-15T04:30:20+5:302021-01-15T04:30:20+5:30
जिल्हा रुग्णालय येथील ७९ अहवालांपैकी तीन अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे. त्यात धुळे शहरातील तुळशीरामनगर, देवपुरातील आणि सम्राटनगर येथील प्रत्येकी ...

जिल्ह्यात १९ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळले
जिल्हा रुग्णालय येथील ७९ अहवालांपैकी तीन अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे. त्यात धुळे शहरातील तुळशीरामनगर, देवपुरातील आणि सम्राटनगर येथील प्रत्येकी एक रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले.
दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय - येथील सहा अहवालांपैकी सर्वच्या सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहे.
शिरपूर उपजिल्हा रुग्णालय - येथील ३६ पैकी तीन अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे. त्यात शिरपुरातील लक्ष्मीनारायणनगर आणि अन्य असे दोन रुग्ण तर तालुक्यातील भाटपुरा येथील एक अशा एकूण तीन रुग्णांचा समावेश आहे.
भाडणे, ता. साक्री - येथील कोविड सेंटरवरील ७९ पैकी तीन अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे. त्यात बसरावल प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक तर दुसाने प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन अशा एकूण तीन रुग्णांचा समावेश आहे. तसेच
रॅपिड ॲण्टीजेन टेस्टमधील एक अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यात साक्री तालुक्यातील वाघापूर येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
महानगरपालिका - रॅपिड ॲण्टीजेन टेस्टमध्ये १५७ पैकी एक अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. त्यात विद्यानगरीतील एका व्यक्तीचा समावेश आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय - येथील १० पैकी एक अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.
एसीपीएम लॅबमधील चारही अहवाल निगेटिव्ह आले आहे.
खाजगी लॅब - मधील १८ अहवालांंपैकी सात अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे. त्यात साक्री शहरातील बंजारा गल्लीतील एक तर तालुक्यातील आखाडे येथील एक.
शिंदखेडा - तालुक्यातील वारूळ येथील दोन आणि धुळे शहरातील साक्री रोडवरील सिंहस्थनगरातील एक, जयहिंद काॅलनी प्रिन्स ग्राउंंडजवळील एक आणि नवरंग हाउसिंग सोसायटीमधील एक रुग्ण असे एकूण सात रुग्ण पाॅझिटिव्ह आढळले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १४ हजार ६४३ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले आहे.