नरडाणा येथे 18 हजारांचा दारूसाठा जप्त

By Admin | Updated: May 22, 2017 12:42 IST2017-05-22T12:42:34+5:302017-05-22T12:42:34+5:30

एका खोलीतून अवैधरित्या दारूची विक्री करणा:याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतल़े

18,000 of the liquor seized at Naradaa | नरडाणा येथे 18 हजारांचा दारूसाठा जप्त

नरडाणा येथे 18 हजारांचा दारूसाठा जप्त

 धुळे,दि.22- शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा गावातील डी़ डी़सी बँकेच्या खालील साई कॉम्लेक्सच्या पाठीमागे  असलेल्या एका खोलीतून अवैधरित्या दारूची  विक्री करणा:याला स्थानिक गुन्हे  शाखेच्या पथकाने ताब्यात घेतल़े त्यांच्याकडून  18 हजार 799 रूपयांचा देशी विदेशी दारू व बिअरचा साठा जप्त करण्यात आला आह़े 

रविवारी रात्री ही कारवाई करण्यात आली़ बेकायदेशीररित्या दारू जवळ बाळगून त्यांची चोरटी विक्री करतांना दीपक साहेबराव पाटील (रा़ पाष्टे ता़ शिंदखेडा) याला ताब्यात घेण्यात आल़े याप्रकरणी पो़काँ नितील मोहने यांच्या फिर्यादीवरून नरडाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े ही कारवाई पथकातील पो़ह़ेकाँ जितेंद्र आखाडे, पो़ना आरीफ उस्मान शेख, गौतम सपकाळे, विजय सोनवणे, मनोज बागूल, अमिन रणमळे यांनी केली़ 

Web Title: 18,000 of the liquor seized at Naradaa