हॉटेलमधून 18 हजारांचा दारूसाठा जप्त

By Admin | Updated: May 29, 2017 13:24 IST2017-05-29T13:24:33+5:302017-05-29T13:24:33+5:30

नेर येथे एलसीबीची कारवाई

18,000 of the liquor seized from the hotel | हॉटेलमधून 18 हजारांचा दारूसाठा जप्त

हॉटेलमधून 18 हजारांचा दारूसाठा जप्त

ऑनलाईन लोकमत

धुळे,दि.29- तालुक्यातील नेर येथे म्हसदी फाटा लगत असलेल्या हॉटेल शुभमवर छापा टाकून स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने 18 हजार 220 रूपयांचा विदेशी दारूसह बिअरचा साठा जप्प केला़ रविवारी रात्री ही कारवाई करण्यात आली़ 
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप माळी, नासिर पठाण, पो़ह़ेकाँ सुनिल विंचुरकर, पो़काँ मनोज बागुल, विलास पाटील, नितिन मोहने, विजय सोनवणे, चेतन कंखरे यांनी रविवारी रात्री हॉटेलवर छापा टाकला़ तेथे तपासणी केली असता 18 हजार 220 रूपयांचा विदेशी व बियरचा साठा मिळून आला़ याप्रकरणी पो़काँ गौतम सपकाळे यांनी धुळे तालुका पोलिसात दिलेल्या फिर्याद दिली आह़े हॉटेल मालक तुषार भटुलाल जयस्वाल (रा़ नेर) व हॉटेल व्यवस्थापक अजरुन वंजु भोई (रा़ भोई गल्ली, नेर) या दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 

Web Title: 18,000 of the liquor seized from the hotel