१८ अहवाल पॉझिटिव्ह, मृत्यू नाही जिल्ह्यात १४ हजार १६० कोरोना बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 11:26 IST2020-12-14T11:26:15+5:302020-12-14T11:26:29+5:30
धुळे : जिल्ह्यातील आणखी १८ जणांचे कोरोना अहवाल रविवारी पाॉझिटीव्ह आले आहेत. रविवारी एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही..जिल्ह्यातील एकूण ...

dhule
धुळे : जिल्ह्यातील आणखी १८ जणांचे कोरोना अहवाल रविवारी पाॉझिटीव्ह आले आहेत. रविवारी एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही..जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या १४ हजार १६० इतकी झाली आहे.
रविवारच्या अहवालानुसार, जिल्हा रुग्णालय धुळे येथील ६८ अहवालांपैकी ९ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात, जयहिंद कॉलनी ३, दत्तमंदिर देवपूर १, वृंदावन कॉलनी २, सुंदर नगर १, बोरसे नगर येथील दोन जणांचा समावेश आहे.
उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील ९० अहवालांपैकी २ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात, सवाई मुकटी १ व जखाने येथील एका रुग्णाचा समावेश आहे. उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील ८१ पैकी ५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात, खरदे, शिरपुर ४ व सराफ बाजार ,शिरपुर येथील एकाला कोरोनाची बाधा झाली आहे. साक्री कोविड केंद्रातील २ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात, जि.प. जबापूर व जि.प. शाळा मंदितोंडा येथील एक अहवाल पॉझिटिव्ह आला. नागरिकानी कोरोनाचा संर्सग रोखण्यासाठी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.