१८ रूग्णांमध्ये १४ पुरूष तर चार महिलांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 00:00 IST2020-05-08T23:56:26+5:302020-05-09T00:00:48+5:30
शहरातील 17 तर अमळनेर येथील एक रुग्ण

Dhule
धुळे -शुक्रवारी तब्बल १८ रूग्णांचे अहवाल पॉजीटीव्ह आले. बाधीत रूग्णांमध्ये धुळे शहरातील १७ जणांचा समावेश आहे. एसआरपीएफच्या सात जवानांचे रिपोर्ट पॉजीटीव्ह आले आहेत. गुरूवारी देवपूर परिसरातील पॉजीटीव्ह आढळलेल्या डॉक्टरच्या संपर्कातील चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच अमळनेर येथील एका व्यक्तीचेही रिपोर्ट पॉजीटीव्ह आले. पॉजीटीव्ह आढळलेल्या १८ रूग्णांमध्ये १४ पुरूष तर चार महिलांचा समावेश आहे.