१८ किलो गांजा जप्त, तरुणाला अटक
By Admin | Updated: February 26, 2017 00:33 IST2017-02-26T00:33:29+5:302017-02-26T00:33:29+5:30
धुळे : दुचाकीवरून ओला गांजा घेऊन जाणाºया तरुणाला आझादनगर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी शहरातील गल्ली क्रमांक ४ व ५ च्या बोळीत रंगेहाथ पकडले़

१८ किलो गांजा जप्त, तरुणाला अटक
धुळे : दुचाकीवरून ओला गांजा घेऊन जाणाºया तरुणाला आझादनगर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी शहरातील गल्ली क्रमांक ४ व ५ च्या बोळीत रंगेहाथ पकडले़ गांजा व दुचाकीसह ४७ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे़
इजार अब्दुल रशीर शहा (२३, रा़ म्युनिसिपल कॉलनी, धुळे) असे त्या तरुणाचे नाव आहे़ पोलिसांनी त्याला शुक्रवारी सकाळी विनाक्रमांकाच्या दुचाकीवर प्लॅस्टिक गोणीमध्ये ओला गांजा घेऊन जात असताना घड्याळवाला मशीदकडे जाणाºया वळणावर पकडले़ त्याच्याकडून १८ किलो ओला गांजा व दुचाकी असा एकूण ४७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ तीन दिवसांपूर्वीच धुळे शहर पोलिसांनी चित्तोड रोड परिसरात छापा टाकून भांग दळण्याचा मिनी कारखाना उद्ध्वस्त केला़ तर गेल्या महिन्यात धुळे व साक्री येथे गांजा जप्त करण्यात आला होता.
इंदिरानगरातून ५ हजारांचा गांजा जप्त, दोघांना अटक
चाळीसगाव रोड पोलिसांनी २४ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ऐशीफुटी रस्त्यावरील इंदिरानगरात राहणाºया कौसरबी शेख रशिद ( ६५) हिच्या घराजवळून ५ हजार ५५० रुपये किमतीचा कोरडा गांजा जप्त केला़ पोलिसांनी कौसरबी व शेख सत्तार शेख अहमद ( रा़ काझी प्लॉट, गफुरनगर) दोघांना अटक केली आहे़