पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेस्थळी १७७५ पोलीसांचा ताफा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 11:07 IST2019-02-16T11:04:24+5:302019-02-16T11:07:11+5:30
आज दुपारी १ वाजता होणार सभा, शहरात रिक्षाव्दारे उपस्थितीचे आवाहन

dhule
धुळे : शहरातील मालेगाव रोडवरील गोशाळेच्या मैदानावर दुपारी पावणे तीन वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे.
पंतप्रधान मोदी हे जळगाव येथून हेलिकॉप्टरने आज दुपारी १ वाजता धुळ्यात दाखल होणार आहे़ यावेळी त्यांच्या हस्ते मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्ग, सुलवाडे-जामफळ उपसा सिंचन योजना, अक्कलपाडा धरण ते धुळे शहर पाईपलाईन योजनांचे भूमिपूजन आणि विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. दरम्यान सभेच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे़ त्यात १ पोलीस अधीक्षक, ८ अपर पोलीस अधीक्षक, २० उपविभागीय अधीकारी, ४६ पोलीस निरीक्षक, २०० सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, १५०० पोलीस कर्मचारी असे एकूण १७७५ पोलीसांचा ताफा सज्ज झाला आहे़ बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांनी सकाळी नियोजित पार्कीेगस्थळी वाहने पार्कीगला सुरूवात केली आहे़