१७ अहवाल पॉझिटिव्ह, एकही मृत्यू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 12:21 IST2020-11-19T12:21:39+5:302020-11-19T12:21:55+5:30

जिल्हयातील बाधितांची संख्या १३ हजार ७५२ तर मृत्यूची संख्या ३७७

17 reports positive, no deaths | १७ अहवाल पॉझिटिव्ह, एकही मृत्यू नाही

dhule

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्ह्यातील १७ जणांचे अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आले. धुळे शहरातील १३ व ग्रामीण भागातील ४ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या १३ हजार ७५२ इतकी झाली आहे. तर ३७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
येथील ३१७ अहवालांपैकी देवपूर येथील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील सर्व १३१ अहवाल निगेटिव्ह आले. उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील सर्व ८२ अहवाल निगेटिव्ह आले. तसेच रॅपिड अँटीजन टेस्टच्या ५ अहवालांपैकी १ अहवाल पॉझिटिव्ह आला. भाडणे साक्री येथील कोविड केअर सेंटर मधील सर्व ९२ निगेटिव्ह आले. तसेच रॅपिड अँटीजन टेस्टच्या २ अहवालांपैकी शेवाळी येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मनपा कोविड सेंटर असलेल्या तंत्रनिकेतन महाविद्यालयातील १९६ अहवालांपैकी ३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व १६ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. खाजगी प्रयोगशाळेतील ३१ अहवालापैकी ११ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात, श्रीनगर चितोड रोड धुळे १, साक्री रोड १, अग्रवाल नगर १, वाडीभोकर रोड १, विद्यानगर १, वल्लभनगर येथील एकाचा समावेश आहे. .

Web Title: 17 reports positive, no deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.