नागपूर, ता.साक्री येथे वीज कोसळल्याने १७ शेळ्या व २ मेंढ्या ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:27 IST2021-06-06T04:27:02+5:302021-06-06T04:27:02+5:30
परंतु त्यातच शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास नागपूर जवळील लखमापूर शिवारात जोरदार वीज कोसळली व त्यात एकूण १७ शेळ्या ...

नागपूर, ता.साक्री येथे वीज कोसळल्याने १७ शेळ्या व २ मेंढ्या ठार
परंतु त्यातच शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास नागपूर जवळील लखमापूर शिवारात जोरदार वीज कोसळली व त्यात एकूण १७ शेळ्या व २ मेंढ्या ठार झाल्या. त्यामध्ये लहानू सोनू गोयर यांच्या ७ शेळ्या व १ मेंढी, संतोष विठ्ठल सुसाडे ८ शेळ्या व १ मेंढी आणि वसंत बापू मारणार यांच्या २ शेळ्यादेखील जागीच ठार झाल्या. ही संपूर्ण घटना वसंत मारणार यांच्या शेतात घडली, यात या शेळी व मेंढीपालन करणाऱ्या बांधवांचे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. ही संपूर्ण घटना नागपूरचे लोकनियुक्त सरपंच रवींद्र उत्तम पगारे यांच्या लक्षात येताच त्यांनी शनिवारी तलाठी एम.यू. अहिरे यांना बोलावून घटनास्थळी धाव घेतली व त्या ठिकाणी जाऊन संपूर्ण घटनेचा पंचनामा केला.जेणेकरून या शेळीपालन करणाऱ्या बांधवांना नुकसान भरपाई मिळेल. पंचनामा करते प्रसंगी कोतवाल युवराज मासुळे, लहानू गोयर, संतोष सुसाडे,वसंत मारनर आदी नागरिक उपस्थित होते.