१६ अहवाल पॉझिटिव्ह, एका रुग्णाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:27 IST2021-06-06T04:27:07+5:302021-06-06T04:27:07+5:30
शनिवारच्या अहवालानुसार, जिल्हा रुग्णालय धुळे येथील एक अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात सैनिक कॉलनी येथील एकाचा समावेश आहे. उपजिल्हा रुग्णालय ...

१६ अहवाल पॉझिटिव्ह, एका रुग्णाचा मृत्यू
शनिवारच्या अहवालानुसार, जिल्हा रुग्णालय धुळे येथील एक अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात सैनिक कॉलनी येथील एकाचा समावेश आहे. उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील १५ अहवालांपैकी २ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात, पारसमाल व दोंडाईचातील गोविंद नगर येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
भाडणे कोविड केंद्रात झालेल्या ७ कोरोना चाचण्यांपैकी २ अहवाल पॉझिटिव्ह आले त्यात, सतरापाडा व देऊर येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. तसेच
रॅपिड अँटीजन टेस्टच्या १६८ अहवालांपैकी ४ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील १४ अहवालांपैकी ३ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात, चितोड १,
शिरपूर १ व साक्री येथील एकाचा समावेश आहे. एसीपीएम महाविद्यालयाच्या कोरोना प्रयोगशाळेतील चाचण्यांमधून पिंपळगाव येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.