१५१ दात्यांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:34 IST2021-08-29T04:34:36+5:302021-08-29T04:34:36+5:30
धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नामदार डॉ.तुषारभाऊ रंधे व संस्थेचे खजिनदार आशाताई रंधे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे उदघाटन धुळे-नंदुरबार ...

१५१ दात्यांनी केले रक्तदान
धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नामदार डॉ.तुषारभाऊ रंधे व संस्थेचे खजिनदार आशाताई रंधे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे उदघाटन धुळे-नंदुरबार ग.स. बँकेचे माजी चेअरमन तथा संस्थेचे सचिव निशांत रंधे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ह्या प्रसंगी स्वखुशीने १५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच वृक्षारोपणाचे उद्घाटन जिल्हा वन अधिकारी डॉ.एम.एस. भोसले, उपसंरक्षक अमित जाधव यांच्या हस्ते संस्थेच्या विविध शाळा,महाविद्यालयात विविध प्रजातीचे चार हजार वृक्षाचे लागवड करण्यात आली.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा वन अधिकारी डॉ. एम.एस.भोसले, उपसंरक्षक अमित जाधव, किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव निशांत रंधे,माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष राहुल रंधे, संस्थेचे विश्वस्त आनंदसिंग राऊड, श्यामकांत पाटील,पंचायत समिती सदस्य शशिकांत पाटील, माजी सरपंच योगेश बोरसे, विनायक कोळी, पतसंस्थेचे चेअरमन शशांक रंधे, माजी सरपंच भटू माळी, पिन्टू माळी,भिकन पाटील, माजी सरपंच महेश चौधरी, पं.स. सदस्य बाबा पाटील, प्रवीण शेखर माळी, महाजन, पं.स. सदस्य वैशालीबाई सोनवणे ,डॉ.अतुल बडगुजर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य सुकदेव भिल, विकास सोसायटीचे माजी व्हा.चेअरमन भागवत पवार, सावकार पाटील, नितीन पाटील, तुषार सत्यविजय,निलेश महाजन, भटू माळी,राज निकम,संस्थेचे व्यवस्थापक ऐ.ऐ.पाटील, किशोर बच्छाव, भैय्या माळी, सिताराम माळी, प्रमोद बोरसे,इन्स्टिट्यूट कॉलेजचे प्राचार्य डॉ. पी एस पाटील, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य महेश पवार ,प्रा कल्पेश वाघ,धुळे येथील अर्पण ब्लड बँकेचे डॉ. रुपचंद तेली,संदेश राठोड, मिलिंद इंगळे, प्रशांत राजपूत, हर्षदा पिंगळे आदी उपस्थित होते.
धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नामदार डॉ.तुषारभाऊ रंधे व संस्थेचे खजिनदार आशाताई रंधे यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या विविध शाखेमध्ये वृक्षारोपणाचे उद्घाटन करून निंब,चिंच, गुलमोहर, याच्यासह विविध प्रकारची चार हजार वृक्षांची लागवड करण्यात आले. त्याचबरोबर सौ. सावित्रीताई रंधे सभागृहात रक्तदान शिबिराचे उद्घाटन संस्थेचे सचिव निशांत रंधे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी स्वखुशीने १५१ रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरास सहभाग नोंदवला.
या रक्तदान शिबिराचे व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर , राहुल रंधे फाउंडेशन व कर्मवीर प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले होते. तर रक्तदान शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बोराडी येथील इन्स्टिट्यूट ऑफ व महाराणी अहिल्याबाई होळकर कॉलेज ऑफ फार्मसी याच्या सर्व कर्मचाऱ्यांनी श्रम घेतले.