धुळ्यातील कोविड केअर सेंटरमधून १५ रुग्णांचे पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 12:22 IST2020-07-05T12:09:20+5:302020-07-05T12:22:16+5:30
बाफना हॉस्पिटल : पोलिसात गुन्हा दाखल नाही

धुळ्यातील कोविड केअर सेंटरमधून १५ रुग्णांचे पलायन
धुळे : धुळ्यातील नगावबारी परिसरातील बाफना हॉस्पिटल येथे कोविड केअर सेंटर आहे़ या ठिकाणी क्वारंटाईन केलेले १५ रुग्णांनी पलायन केल्याचे समोर आले आहे़ यात धुळे तालुक्यातील हेंकळवाडी गावातील ७ आणि मुकटी गावातील ८ रुग्णांचा समावेश आहे़ अशी तक्रार समोर आली असलीतरी यासंदर्भात पोलीस ठाण्यात मात्र अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही़