१५ बालविवाह थांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 22:49 IST2019-11-13T22:48:33+5:302019-11-13T22:49:27+5:30
चाईल्ड लाईन इंडिया उपक्रम : मीना भोसले यांची माहिती

Dhule
धुळे : महिला व बालविकास मंत्रालयाअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या चाईल्ड लाईन प्रकल्पात गेल्या १० महिन्यात जिल्ह्यात ० ते १८ वर्ष वयोगटातील लावण्यात येणारे १५ बालविवाह थांबविण्यात यश मिळल्याची माहिती हा प्रकल्प राबविणाऱ्या सप्तश्रृंगी बहुउद्देशीय महिला संस्थेच्या संचालिका मीना भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महिला व बालविकास मंत्रालयातर्फे राज्यात बालविवाह, बाल कामगारीवर निर्बंध बसविण्यासाठी चाईल्ड लाईन हा प्रकल्प फेब्रुवारी २०१९ पासून जिल्ह्यात सप्तश्रृंगी बहुउद्देशीय महिला संस्थेतर्फे राबविण्यात येत आहे. फाऊंडेशन ही महिला व बालविकास मंत्रालयाचा एक प्रकल्प आहे. ज्या मुलांना काळजी व संरक्षणाची गरज आहे अशा मुलांना मदत करते. चाईल्ड लाईन १९९८ हा प्रकल्प संस्थेंतर्गत १ फेब्रुवारी २०१८ पासून सुरू करण्यात आले आहे. ० ते १९ वयोगटातील मुलांना वैद्यकिय समुपदेशन, कायदेशिर मदत, गरजू बालकांसाठी काळजी व संरक्षणासाठी नि:शुल्क टोल फ्री सेवा आहे. चाईल्ड लाईनच्या माध्यमातून आतापर्यंत बालविवाह, बालकामगार, भीक मागणारे बालक , हरवलेले बालक, वैद्यकीय मदत, शारीरीक शोषण, भावनिक आधार , शैक्षणिक मदत अशा एकूण १२२ तक्रारींवर काम सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत शिक्षणाचा अभाव असल्या कारणांमुळे केसेस हाताळतांना नागरीकांचा प्रतिसाद मिळत नाही.(भीक मागणारे बालक), बालकामगार केसेसमध्ये पालकांना बालकामगार कायद्या विषयी माहितीचा अभाव तसेच विविध केसेस नुसार समस्या निर्माण होत असल्याची खंत मीना भोसले यांनी व्यक्त केली. यावेळी नरेंद्र भोई, रूपाली झाल्टे, गिता कटारिया, पूनम अहिरे, रतिलाल बागुल, हिरालाल भोसले उपस्थित होते.