१४ ला तालुकास्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:34 IST2021-09-13T04:34:59+5:302021-09-13T04:34:59+5:30

विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणातूनच इंग्रजी विषयातील गोडी वाढावी म्हणून दरवर्षी तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येते. गेल्या दोन वर्षांपासून शाळा ...

14th taluka level online oratory competition | १४ ला तालुकास्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा

१४ ला तालुकास्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा

विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणातूनच इंग्रजी विषयातील गोडी वाढावी म्हणून दरवर्षी तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येते. गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. विद्यार्थी शिक्षण प्रवाहात रहावे म्हणून इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा ही शाळा सुरू नसल्या तरी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे. गेल्या वर्षीही सदर स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. सदर स्पर्धा ही ग्रामीण भागातील शाळा, शहरी भागातील शाळा, आश्रम शाळा, इंग्लिश मीडियम शाळा व खुला गट अशा पाच गटात घेण्यात आली आहे़ विद्यार्थ्याला कोणत्याही एकाच गटातून सहभाग नोंदविता येणार आहे. खुला गटासाठी पाच विषयांपैकी स्पर्धेच्या दिवशी एक विषय फोनवरून देण्यात येईल, त्या विषयावर आधारित व्हिडीओ रेकॉर्ड करून पाठवावा लागणार आहे.

सदर स्पर्धा नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष तथा संस्थेचे कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, सीईओ डॉ.उमेश शर्मा यांच्या मार्गदर्शखाली घेण्यात आली आहे़ या स्पर्धेत जास्तीत जास्त शाळांनी सहभाग घेण्याचे आवाहन मुख्याध्यापक सी.डी.पाटील यांनी केले आहे.

स्वरचित काव्यलेखन स्पर्धा

शहरातील एच.आर.पटेल कन्या प्राथमिक शाळेत आमदार अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त तालुकास्तरीय अमरिशभाई पटेल यांचे जीवनचरित्र या विषयावर स्वरचित काव्यलेखन स्पर्धा घेण्यात आली आहे़ शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Web Title: 14th taluka level online oratory competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.