१४ अहवाल पॉझिटिव्ह, मृत्यू नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:32 IST2021-01-21T04:32:45+5:302021-01-21T04:32:45+5:30
धुळे - जिल्ह्यातील आणखी १४ रुग्णांचे अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आले. एकूण बाधित रुग्णांची संख्या १४ हजार ७३५ इतकी झाली ...

१४ अहवाल पॉझिटिव्ह, मृत्यू नाही
धुळे - जिल्ह्यातील आणखी १४ रुग्णांचे अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आले. एकूण बाधित रुग्णांची संख्या १४ हजार ७३५ इतकी झाली आहे. बुधवारच्या अहवालानुसार, उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील ११९ अहवालांपैकी मांजरे ता. शिंदखेडा येथील एक अहवाल पॉझिटिव्ह आला. उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील सर्व १९ अहवाल निगेटिव्ह आले. भाडणे येथील सर्व ११ अहवाल निगेटिव्ह आले. महानगरपालिका रॅपिड ॲण्टीजेन टेस्टच्या १४४ अहवालांपैकी देवपूर येथील दोन अहवाल पॉझिटिव्ह आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व चार अहवाल निगेटिव्ह आले. एसीपीएम प्रयोगशाळेतील आठ अहवालांपैकी गोळीबार टेकडी येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. खाजगी प्रयोगशाळेतील १५ अहवालांपैकी सात अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात, गल्ली क्रमांक २, राजेंद्र लॉजजवळ १, गोपाळनगर, जमनागिरी रोड १, वानखेडकरनगर देवपूर १, स्वामी अपार्टमेंट वडेल रोड देवपूर १ व वाडीभोकर रोड, नेहरूनगर देवपूर येथील तिघांचा समावेश आहे.