शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
4
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
5
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
6
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
7
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
8
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
9
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
10
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
11
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
12
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
13
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
14
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
15
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
16
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
17
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
18
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
19
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
20
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका

जिल्ह्यात १२३४ पोलिओ लसीकरण केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 19:40 IST

धुळे : जिल्ह्यात १७ जानेवारी रोजी शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पल्स पोलिओचे डोस देण्यात येतील. कोरोना विषाणूच्या ...

धुळे : जिल्ह्यात १७ जानेवारी रोजी शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पल्स पोलिओचे डोस देण्यात येतील. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने सतर्कता बाळगावी. या मोहिमेविषयी गावागावात जनजागृती करावी, असे निर्देश पल्स पोलिओ लसीकरण समन्वय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील १ लाख ९१ हजार ६६४ बालकांना पोलिओ लस देण्यात येईल. त्यासाठी १ हजार २३४  लसीकरण केंद्र असतील. बूथवर प्रत्यक्ष डोस देणे, बालकांच्या पालकांना बोलावून आणण्यासाठी तीन हजार ४२६ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. २४६ अधिकारी व कर्मचारी पर्यवेक्षण करतील. याशिवाय जिल्हास्तरावर पर्यवेक्षणासाठी ११ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल. बसस्थानक, रेल्सेस्थानक, तपासणी नाक्यावर ६१ ट्रान्झिट पथके असतील. भटकंती करणारे कामगार, वीटभट्टी, ऊसतोड कामगार, रोड कामगारांच्या बालकांना पोलिओ डोस देण्यासाठी ९५ मोबाइल पथके असतील. याबाबत गावागावांत जनजागृती करण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नवले यांनी सांगितले.पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी गठित टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात नुकतीच झाली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, डॉ. शिवचंद्र सांगळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुबेर चावरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तरन्नुम पाटील, डॉ. प्रसन्न कुलकर्णी, डॉ. भूषण मोरे, अमित राजपूत आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी यादव म्हणाले, जिल्हास्तरावर वैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षकांचे मार्गदर्शनपर प्रशिक्षण दक्षता अधिकाऱ्यांनी घेतले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर काम करणारे, पर्यवेक्षण करणारे आरोग्य सहायक, सहायिका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस, मुख्य सेविका, आशा कार्यकर्ती, स्वयंसेवकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.  जिल्ह्यातील चार तालुक्यांना त्यांचे लसीकरण बूथ, लाभार्थी, घरभेटीची पथके, ट्रान्झिट पथके, मोबाइल पथकांचे नियोजन करण्यात आले आहे.  बसस्थानक, रेल्वेस्थानक, ऊसतोड कामगार, वीटभट्टी कामगार, रोड कामगार, बाजार, यात्रा या ठिकाणी बालकांना पोलिओ देण्यासाठी ट्रान्झिट व मोबाइल पथकांचे नियोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे