१२ आदर्श मातांच्या कार्याचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 13:07 IST2020-03-11T13:06:48+5:302020-03-11T13:07:14+5:30

दोंडाईचा : लायन्स क्लबतर्फे सुवर्णकार भवनात सत्कार समारंभ

१२ The glory of the work of the ideal mothers | १२ आदर्श मातांच्या कार्याचा गौरव

dhule


लोकमत न्यूज नेटवर्क
दोंडाईचा : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लबतर्फे १२ आदर्श मातांचा गौरव करण्यात आला. सुवर्णकार भवनात हा सोहळा पार पडला.
यावेळी नंदुरबारचे जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांच्या मातोश्री कमलाताई बंडू भारुड मुख्य सत्कारमूर्ती होत्या. कमलाताई भारुड यांनी अतिशय काबाडकष्ट करून संस्काराची योग्य जोड देऊन मुलाला घडविले आहे.
लायन्स क्लबने दोंडाईचा शहरातील मोलमजुरी करून आपल्या मुलांना उच्चशिक्षित करणाऱ्या १२ आदर्श मातांचा गौरव केला. कार्यक्रमास लायन्स क्लब इंटरनॅशनलचे प्रांतपाल नितीन बंग, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुसुम निकम, महिला बालकल्याण सभापती प्रियंका ठाकूर, आरोग्य सभापती मनीषा गिरासे, लायन्स क्लबचे कन्हैया बागल, लायन्स क्लब अध्यक्ष राकेश अग्रवाल, मंदाकिनी पाटील, अनिता मंडाले आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात अश्विनी सुभाष चौधरी, कल्पना साहेबराव पाटील, विजया ठाकूर, लता शिवा भिल, विठाबाई विजय मराठे, सरला सुनील सूर्यवंशी, कल्पना रामभाऊ पाटील, इंदुबाई अशोक माणिक, सविता भोई, सुरेखा पाटील, सिंधुबाई पुंडलिक भोई, शकुंतलाबाई अशोक शिंपी या आदर्श मातांना सन्मानचिन्ह व चांदीचे नाणे देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच याच कार्यक्रमात दोंडाईचा शहरातील १६ महिला मंडळ अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. त्यात सारिका इंदानी (इनरव्हील क्लब), संगीता सुनील भावसार (भावसार समाज महिला मंडळ), रुपाली जयदीप शेठ (फ्रेंड्स अँड फॅमिली), वैशाली आयचीत (ब्राह्मण समाज महिला मंडळ), लिलाबाई राधेश्याम अग्रवाल (अग्रवाल महिला मंडळ), सुवर्णा रुणवाल (नवकार बहु मंडळ), राजश्री श्रीश्रीमाल (सुधर्मा महिला मंडळ), पुष्पा मुनोत (तेरापंथी महिला मंडळ), सरिता बोथरा (आदिनाथ कन्या बहु मंडळ), काजल जैन (जिनेन्द्र भक्ती मंडळ), जयश्री अहीरराव (सुवर्णकार महिला मंडळ), शारदा शहा (गुजराती भजनी मंडळ), कल्पना जाधव (जॉयण्टस् सहेली), फातिमा शेख (जॉयण्टस् सहेली प्राईड), संगीता गिरासे (आरसीसी दोंडाईचाकर), राखी उपाध्ये, लक्ष्मी शर्मा (मारवाडी ब्राह्मण मंडळ), मीना चैनानी (सिंधी महिला समाज) आदींचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी लायन्सचे व्ही.एम. पाटील, आशिष अग्रवाल, दिनेश वोरा, चोईथ कुकरेजा, हमजा जिनवाला, पंकज चोळके, निलेश बोथरा, संजय अग्रवाल, किशोर जैन, सुवर्णा रुणवाल, सुगंधा जैन, शितल जैन, राजन कुकरेजा, राणी अग्रवाल, नम्रता अग्रवाल, माधुरी पारख, शकुंतला बागल आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजूषा पाटील यांनी केले.

Web Title: १२ The glory of the work of the ideal mothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे