१ हजार २० विद्यार्थ्यांनी मारली दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:40 IST2021-08-13T04:40:55+5:302021-08-13T04:40:55+5:30
पाचवीच्या परीक्षेसाठी ५ हजार ९४८ विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते. त्यात पहिल्या पेपरला ५ हजार ३०२ विद्यार्थी हजर होते. तर ...

१ हजार २० विद्यार्थ्यांनी मारली दांडी
पाचवीच्या परीक्षेसाठी ५ हजार ९४८ विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते. त्यात पहिल्या पेपरला ५ हजार ३०२ विद्यार्थी हजर होते. तर ६४६ विद्यार्थी गैरहजर होते. पहिल्या पेपरला ८९.१४ टक्के विद्यार्थी उपस्थित होते. दुसऱ्या पेपर ५ हजार २९८ विद्यार्थ्यांनी दिला. तर ६५० विद्यार्थ्यांनी दांडी मारली. दुसऱ्या पेपरला ८९.०७ टक्के विद्यार्थी उपस्थित हाेते.
आठवीसाठी ५ हजार ५ विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते. पहिल्या पेपरला ४ हजार ६३१ विद्यार्थी हजर होते. तर ३७४ विद्यार्थी गैरहजर होते. उपस्थितीचे प्रमाण ९२.५३ एवढे होते. तर दुसऱ्या पेपरला ४६२९ विद्यार्थी हजर होते. ३७६ विद्यार्थ्यांनी दांडी मारली. उपस्थितीचे प्रमाण ९२.४९ टक्के एवढे होते.
दरम्यान, शिष्यवृत्तीचे दोन्ही पेपर सुरळीत पार पडले. पेपर सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांची तपासणी केल्यानंतरच त्यांना आत सोडण्यात आले होते. परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांसह पालकही दाखल झाल्याने, शाळेच्या आवाराला यात्रेेचे स्वरूप प्राप्त झाले होते. परीक्षा यशस्वितेसाठी जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.