१ लाख क्विंटल मका पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 22:36 IST2020-07-16T22:36:08+5:302020-07-16T22:36:23+5:30
शिंदखेडा : तालुक्यात दोन दिवस अगोदरच खरेदी झाली बंद

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा : तालुक्यात मका खरेदीला शासनाकडून मोठा गाजावाजा करत सुरुवात झाली. त्यात बारदान नसल्याने अनेक दिवस थोडीफार खरेदी होऊन बंद होत होती. १५ जुलै पर्यंत खरेदीस वाढ देण्यात आली. तत्पूर्वीच १३ तारखेला अचानक खरेदी बंद करण्यात आल्याने आॅनलाइन नोंदणी केलेले १५२३ शेतकऱ्यांचा सुमारे एक लाख क्विंटल मका खरेदीअभावी पडून आहे.
त्यात शासनाने खरेदी, खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने बंद केल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. जगाचा पोशिंदाच शासनाच्या धोरणामुळे भिकेला लागण्याची वेळ आली आहे. शासनाने लवकरात लवकर मका खरेदी करण्याची मागणी शासन व लोकप्रतिनिधींकडे शेतकरी करीत आहेत.
यावर्षी शिंदखेडा तालुक्यात अतिपावसामुळे खरीप हंगाम पावसामुळे वाया गेला. त्यात विहिरींना बºयापैकी पाणी आल्याने खरीपाचा वाया गेलेला हंगाम रब्बी पिकात घेऊ या आशेवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी मका व ज्वारी पिकाची लागवड केली. त्यात ऐन हंगामात कोरोनाच्या विषाणूने जगभर थैमान घातले. लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद आहेत. त्यात १ मे पासून मका व ज्वारी खरेदीला सुरवात झाली. त्यात कधी बारदान नाही, तर कधी हमाल नाही अशी कारणे दाखवून अनेक दिवस बंद राहत होते. त्यात मका खरेदीसाठी खरेदी विक्री संघात १६४६ शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी करण्यात आली. अचानक १३ तारखेला खरेदी बंद करण्यात येऊन शासनाचे खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने बंद करण्याचे कारण सांगितले जात आहे. शासन नुसते उद्दिष्ट्यपूर्तीसाठीच काम करते का असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला असून तात्काळ मका खरेदी न झाल्यास आधीच अडचणीत असलेला शेतकरी पुन्हा अडचणीत जाणार असून शासनाने नुसते उद्दिष्टे न बघता शेतकºयांचा मका खरेदी करून त्याला उभारी देण्याची गरज निर्माण झाली आहे.
तरी शासन व लोकप्रतिनिधी यांनी यात तात्काळ लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.