1 lakh 70 thousand tons of sugarcane will be crushed in the coming season | येत्या हंगामात १ लाख ७० हजार टन उसाचे गाळप होणार

dhule


लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळनेर : साक्री तालुक्यातील उत्पादीत होणारा ऊस हा नाशिक जिल्ह्यातील साखर कारखान्यांना पुरविण्यात येत असतो. यावेळी साक्री तालुक्यातून १ लाख ७० हजार टन ऊसाचे गाळप येत्या हंगामात होणार असून, अंदाजे १९५० हेक्टर वरील ऊस गाळपसाठी तयार आहे,
सध्या शेतीमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी हतबल होऊन ऊस लागवड करीत आहे. यामुळेच यंदा नव्याने ४३५ हेक्टर ऊस लागवड झाली आहे.
साक्री तालुक्यात पिंपळनेर, दहीवेल, कासारे व साक्री अशी मंडळे असून यंदा प्रत्येक मंडळातून गाळपासाठी ऊस उचलण्यात येणार आहे. यात पिंपळनेर मंडळातून ६०,०००, दहिवेल मंडळातून २०,००० टन, कासारे मंडळात ४०,००० टन, साक्री मंडळातून ४१,००० टन इतका ऊस गाळप होणार आहे म्हणजे एकूण १ लाख६१ हजार टन उसाचे गाळप होणार आहे.
पिंपळनेर परिसरातील ऊस नाशिक जिल्ह्यातील कारखान्यांना पुरविला जातो. यात प्रमुख द्वारकाधीश साखर कारखाना ताराहाबाद हा नोव्हेंबर महिन्यात सुरू होणार असल्याचे समजते. शेतकऱ्यांना इतर पिकांपेक्षा ऊस उत्पादनात समाधानकारक पैसा मिळत असल्याने तसेच शेतीत इतर नुकसान टाळण्यासाठी ऊस लागवडीवर भर असल्याचे दिसत आहे. पाणी खते देणे सोईस्कर होते, तर ठिबकवर ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले आहे, तसेच भविष्यात साखर कारखान्यांना ऊस मिळावा यासाठी ऊस लागवडकरिता द्वारकाधीश साखर कारखानातर्फे ऊस बियाणे शेतकऱ्यांना दिले जात आहे.गेल्या वर्षी दोन हजार पाचशे रुपये या भावाने साखर उत्पादक कारखान्यांनी पेमेंट केले होते.

Web Title: 1 lakh 70 thousand tons of sugarcane will be crushed in the coming season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.