जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:22 IST2021-06-29T04:22:35+5:302021-06-29T04:22:35+5:30

यात कोषाध्यक्षपदी प्रकाश चव्हाण, जिल्हा उपाध्यक्षपदी रफिक तांबोळी (उमरगा), ज्ञानेशवर गीते (भूम), जिल्हा संघटकपदी महेंद्र धुरगुडे (तुळजापूर), महिला कार्यध्यक्षपदी ...

Zilla Parishad, Panchayat Samiti Member Association Executive announced | जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

यात कोषाध्यक्षपदी प्रकाश चव्हाण, जिल्हा उपाध्यक्षपदी रफिक तांबोळी (उमरगा), ज्ञानेशवर गीते (भूम), जिल्हा संघटकपदी महेंद्र धुरगुडे (तुळजापूर), महिला कार्यध्यक्षपदी उषा यरकळ (उस्मानाबाद), जिल्हा सरचिटणीसपदी उद्धव साळवी (वाशी), महिला उपाध्यक्षपदी शीतल पाटील तर जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी दत्तात्रय देवळकर (उस्मानाबाद) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. बैठकीस जिल्हा परिषद सदस्य तथा काँग्रेसचे गटनेते प्रकाश आष्टे, प्रकाश चव्हाण, प्रशांत कांबळे, उषा यरकळ, ज्ञानेश्वर गीते, उद्धव साळवी, रफिक तांबोळी, मदन बारकूल, दत्ता देवळकर, दीपक जवळगे, राहुल पाटील, सतीश दैन यांच्यासह पंचायत समिती सदस्यही उपस्थित होते.

चौकट..………

आठ तालुकाध्यक्षही केले जाहीर...

असोसिएशनच्या उमरगा तालुकध्यक्षपदी सचिन पाटील, कळंब तालुकाध्यक्षपदी मदन बारकूल, लोहारा अध्यक्षपदी अश्विनी जवळगे, भूम अध्यक्षपदी पल्लवी खटाळ, वाशी अध्यक्षपदी बालाजी जगताप, तुळजापूर अध्यक्षपदी चित्तरंजन सरडे, उस्मानाबाद अध्यक्षपदी संजय लोखंडे तर परांडा अध्यक्षपदी काम करण्याची संधी गुलाब शिंदे यांना देण्यात आली आहे.

Web Title: Zilla Parishad, Panchayat Samiti Member Association Executive announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.