ईट येथे तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 18:56 IST2019-02-23T18:54:49+5:302019-02-23T18:56:22+5:30
सचिन सारंगधर शिंदे असे मृताचे नाव आहे

ईट येथे तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या
ईट (जि. उस्मानाबाद) : येथील शिक्षक कॉलनीत वास्तव्यास असलेल्या एका ३० वर्षीय तरूणाने पत्र्याच्या आडूला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, ईट येथील शिक्षक कॉलनी परिसरात वास्तव्यास असलेल्या सचिन सारंगधर शिंदे या तरूणाने शुक्रवारी रात्री राहत्या घरातील पत्र्याच्या आडूला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर शनिवारी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार केले. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोना महादेव राऊत हे करीत आहेत.