शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

तरुण शेतकऱ्यांची भारीच 'टेक्निक'; मातीच्या बेडवर नव्हे, २२ हजार कुंड्यात फुलवली फूलशेती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 18:34 IST

मातीच्या बेडऐवजी फुलदाणी म्हणून वापरण्यात येणाऱ्या कुंडीचा वापर करत त्यांनी सुनियोजित पद्धतीने ३० गुंठ्यात एक महिन्यापूर्वी जरबेरा फुलाची लागवड केली

कळंब : दुष्काळग्रस्त, पारंपरिक शेती करणारा भाग अशी कायम ओळख असलेल्या कळंब तालुक्यात काही तरुण शेतकऱ्यांनी नवप्रयोगाची कास धरली आहे. यातूनच बोर्डा येथे तीन तरुणांनी एकत्र येत तब्बल ३० गुंठे क्षेत्रात २२ हजार मातीच्या कुंड्यांचा वापर करत मृदेच्या बेडचा वापर न करता फूलशेती सुरू केली आहे.

तालुक्यातील बोर्डा येथील तरुण शेतकरी चव्हाण बंधू हे शेतीमातीशी जोडले गेलेले कुटुंब. विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारी ही मंडळी शेतीमध्येही तितकीच प्रयोगशील, सातत्यानं नवप्रयोगाची कास धरणारी अन् नवतंत्राचा अवलंब करणारी.

यापैकीच शीतल आणि दिनेश या चव्हाण बंधूंनी आपले शेजारी मित्र शांतीलिंग करंडे यांच्यासमवेत यंदा पुन्हा एका नव्या प्रयोगाला आकार दिला आहे. यासाठी आपल्या पॉलिहाऊसमध्ये जरबेरा फुलवायचा; पण प्रचलित पद्धतीने नव्हे तर नव्या 'टेक्निक' चा वापर करत असा त्यांनी निश्चय केला होता.

त्यानुसार मातीच्या बेडऐवजी फुलदाणी म्हणून वापरण्यात येणाऱ्या कुंडीचा वापर करत त्यांनी सुनियोजित पद्धतीने ३० गुंठ्यात एक महिन्यापूर्वी जरबेरा फुलाची लागवड केली आहे. यामुळे त्याचा लागवड, उत्पादन खर्च कमी तर मेहनत, मशागत हलकी होणार आहे. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या प्रयोगाची प्रयोगशील शेतकऱ्यांत चांगलीच चर्चा होत आहे.

कर्नाटकातून आणल्या २२ हजार कुंड्यामातीच्या बेडवर आजवर त्यांनी जरबेरा फूलशेती केली. यात जोखीम वाढली, खर्च वाढला. परत यासाठी लागणारे शेणखत व गेरू माती मिळणे कठीण झाले. यामुळे या मातीच्या बेडला फाटा देत चव्हाण व करंडे यांनी आपल्या ३० गुंठे क्षेत्रासाठी बेळगाव येथून मातीच्या ‘लाईट वेट’ २२ हजार ५०० कुंड्या आणत त्या लोखंडी स्टॅण्डवर बसवल्या. यावर पुढे शेती फुलवली आहे.

कुंड्या, कोकोपीट, रोपे, ड्रिप अन्....या कुंड्यात पुणे येथून प्रत्येकी ४० रुपयाला एक याप्रमाणे साडेबावीस हजार रोपे आणली. ती कोकोपीटच्या सहाय्याने लावली. यास ड्रिपने दिवसांतून तीनदा, प्रत्येकी २४० मिली पाणी तसेच खत, औषधी दिली जात आहेत. यामुळे तर खर्च वाचलाच, शिवाय प्लॉटची लाईफ वाढेल, असे शीतल चव्हाण व दिनेश चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीOsmanabadउस्मानाबाद