तरुण आणि चिमुकल्यांनाही होतेय कोरोनाची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:34 IST2021-04-22T04:34:18+5:302021-04-22T04:34:18+5:30
सुरुवातीला आलेल्या लाटेत लहान मुले आणि तरुणांना कोरोनाची बाधा कमी प्रमाणात होत असल्याचे चित्र होते. परंतु, पहिल्या लाटेच्या ...

तरुण आणि चिमुकल्यांनाही होतेय कोरोनाची बाधा
सुरुवातीला आलेल्या लाटेत लहान मुले आणि तरुणांना कोरोनाची बाधा कमी प्रमाणात होत असल्याचे चित्र होते. परंतु, पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत आलेला कोरोना अतिशय गंभीर असून झपाट्याने याचा प्रसार सर्व स्तरातील नागरिकांना होत आहे. गेल्या महिनाभरात झालेल्या चाचण्यामध्ये २१ ते ४० वयोगटातील तब्बल ३२ तरुण, तरुणींना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. शहरातील यशवंतनगर भागात ४ मार्चला दुसऱ्या लाटेतील कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच गेले. १९ एप्रिल पर्यंत ५ ते १० वर्ष वयोगटातील एकच मुलाला कोरोनाची लागण झाली होती. माो, मंगळवारी चार चिमुकल्यांसह, ११ ते २० वयोगटातील ५, तर ४० ते ६० या वयोगटात १९ आणि ४१ ते ८५ वयोगटात १३ रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे.
यामध्ये मुरुम शहरात मंगळवारी १० तर ग्रामीण भागात १२ रुग्ण आढळून आले. शहरातील यशवंतनगर भागात सर्वाधिक ६ ,तर संभाजीनगर ३, टिळक चौक १ ,ग्रामीण भागातील आलूर मध्ये ४ ,गणेशनगर ३ ,अचलेर २,भुसणी ,तुगाव ,खसगी येथे प्रत्येकी एक असे २२ रुग्ण आढळून आले. बांधितामध्ये ५ ते १० वयोगटातील ४ ,तर १० ते २० वयातील ४,२० ते ४० वयोगटातील ७ आणि ४१ ते ७० वयोगटातील ८ रुग्णांचा समावेश आहे. बुधवारी झालेल्या १२ जणांच्या रँपिड अँटिजेन चाचणीत दोघांचे अहवाल पॉजिटीव्ह आले. यात शहरातील सोनार गल्लीतील ३५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले तर दोन दिवसांपूर्वी पाठवलेल्या ८ स्वॅबचे अहवाल बुधवारी आरोग्य विभागाला प्राप्त झाले. यामध्ये शहरातील दोन तर कोरेगाववाडी येथील एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील बाधितांची संख्या ७४ वर पोहचली आहे. सध्या ४३ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. उपचारानंतर बरे झालेल्या २७ जणांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आले होता.
फोटोओळी : मुरूमः शहरातील यशवंतनगर भागात ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ मोहिमे अंतर्गत पालिकेचे कार्यालयीन अधिकक्षक उमाकांत देशपांडे, अंगणवाडी कार्यकर्ती मनिषा माने व शिंदे यांच्याकडून सर्वे करण्यात आला.