येणेगुरात ७७ ज्येष्ठांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:57 IST2021-03-13T04:57:44+5:302021-03-13T04:57:44+5:30
येणेगूर - येथील प्राथमिक आरोग्य केन्द्रात शुक्रवारी ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या मोफत कोविड लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. दिवसभरात ७७ ...

येणेगुरात ७७ ज्येष्ठांनी घेतली लस
येणेगूर - येथील प्राथमिक आरोग्य केन्द्रात शुक्रवारी ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या मोफत कोविड लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. दिवसभरात ७७ जेष्ठ नागरिकांना कोविशिल्ड लसीचे डोस देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. साईनाथ जळकोटे व डॉ. अंकिता जळकोटे यांनी दिली. याप्रसंगी जि. प. सदस्य रफिक तांबोळी, बसवेश्वर माळी, वैभव बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती हाेती.. पहिल्या लसीचा डोस येथील माजी सरपंच आण्णय्या स्वामी याना देण्यात आला. दरम्यान, लस घेतलेल्या ७७ लाभार्थ्यांमध्ये ५१ पुरुष व २६ महिलांचा समावेश आहे. लसीकरणासाठी अनिता बनसोडे, विजय धामशेट्टी, सुधाकर जाधव, जी. के स्वामी, सुजित जगताप, मीलन सुरवसे, रूपाली घोंगडे, ललिता घोडके, सुवर्णा गिरी, अनिल स्वामी, महेंद्र गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.