मेंढरं, धनगरी ढाेल अन् भंडाऱ्याची उधळण; धाराशिव जिल्हा कचेरीवर धडकलं पिवळं वादळ
By बाबुराव चव्हाण | Updated: November 30, 2023 18:02 IST2023-11-30T18:00:54+5:302023-11-30T18:02:12+5:30
समाजबांधव मेंढरांसह माेठ्या संख्येने या माेर्चात सहभागी झाले हाेते.

मेंढरं, धनगरी ढाेल अन् भंडाऱ्याची उधळण; धाराशिव जिल्हा कचेरीवर धडकलं पिवळं वादळ
धाराशिव: जिल्ह्यातील धनगर समाजाच्या वतीने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी माेर्चा काढण्यात आला.
समाजबांधव मेंढरांसह माेठ्या संख्येने या माेर्चात सहभागी झाले हाेते.धनगर समाजाच्या माेर्चाला गुरूवारी दुपारच्या सुमारास शहरातील लेडीज क्लब मैदानावरून सुरूवात झाली. यानंतर हा माेर्चा संत गाडगेबाबा चाैक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चाैक, छत्रपती शिवाजी महाराज चाैक, लहुजी वस्ताद साळवे चाैक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. धनगर समाजाला एसटीचे आरक्षण लागू करावे, प्रमाणपत्रांचे तातडीने वाटप सुरू करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. यानंतर मागण्यांचे निवेदन धनगर समाजातील अहिल्या देवींच्या वारसा असलेल्या लहान मुलींच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
मेंढरं, धनगरी ढाेल अन् भंडाऱ्याची उधळण
धाराशिव शहरातील लेडीज क्लब मैदानातून धनगरी ढाेलांचा निनाद आणि भंडाऱ्याची उधळण करून माेर्चाला सुरूवात करण्यात आली. या माेर्चामध्ये धनगर बांधव आपली मेंढरं साेबत घेऊन आले हाेते. जाेपर्यंत एसटीचं आरक्षण मिळत नाही, ताेवर हा लढा सुरूच राहील, असे यावेळी समाजबांधवांनी स्पष्ट केले.