ग्रामस्थांच्या पुढाकारातून येडशीत विलगीकरण सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:34 IST2021-05-11T04:34:48+5:302021-05-11T04:34:48+5:30
येडशी : मागील काही दिवसांपासून येडशीसह परिसरात काेराेनाबाधितांच्या संख्येत वाढ हाेत आहे. अनेक दवाखान्यांत रुग्णांना वेळेवर बेड मिळत नाहीत. ...

ग्रामस्थांच्या पुढाकारातून येडशीत विलगीकरण सेंटर
येडशी : मागील काही दिवसांपासून येडशीसह परिसरात काेराेनाबाधितांच्या संख्येत वाढ हाेत आहे. अनेक दवाखान्यांत रुग्णांना वेळेवर बेड मिळत नाहीत. हा प्रश्न लक्षात घेऊन ग्रामस्थांच्या पुढाकारातून सुमारे ५० बेडची क्षमता असलेले काेविड विलगीकरण सेंटर साेमवारपासून सुरू करण्यात आले.
वाढती रुग्णसंख्या विचारात घेऊन ग्रामपंचायतीचे सदस्य गजानन नलावडे यांच्या पुढाकरातून काही दिवसांपूर्वीच सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली हाेती. बैठकीत झालेल्या चर्चेअंती ग्रामस्थांच्या सहकार्यातून कााेविड विलगीकरण सेंटर उभारण्याचा निर्णय झाला हाेता. यानंतर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी या सेंटरसाठी ५० बेड उपलब्ध करून दिले, तर ग्रामस्थांनी दाेन दिवसांत दीड लाखांची मदत व साहित्य, जेवण, चहाचा खर्च उचलला. साेमवारी हे सेंटर सुरू करण्यात आले. पहिल्याच दिवशी दाेन रुग्णांना येथे भरती करण्यात आले.