येडशीत ‘माझी वसुंधरा’ अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:30 IST2021-02-12T04:30:10+5:302021-02-12T04:30:10+5:30
येडशी : येथे माझी वसुंधरा अभियानांतर्गत ‘माझा गाव सुंदर गाव, सुंदर माझे कार्यालय’ या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतकडून विविध कार्यक्रम ...

येडशीत ‘माझी वसुंधरा’ अभियान
येडशी : येथे माझी वसुंधरा अभियानांतर्गत ‘माझा गाव सुंदर गाव, सुंदर माझे कार्यालय’ या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतकडून विविध कार्यक्रम घेण्यात आले. तसेच ग्रामपंचायत उत्पन्नाच्या १० टक्के निधी महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत एमएस-सीआयटी झालेल्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्र वाटप केले. पाच टक्के अपंग निधीतून अपंग लाभार्थ्यांना रजई व उपचारासाठी निधी वितरित करण्यात आला. या वेळी केंद्रप्रमुख बी. व्ही. मंडलिक, उपसभापती आशिष नायकल, पं. स. सदस्य संजय लोखंडे, ग्रामविस्तार अधिकारी संजय कळसाईत, संरपच गोपाळ नागटिळक, उपसंरपच सुधीर सस्ते, ग्रामविकास अधिकारी संजय आडे, कृषी सहायक महादेव देवकर, तलाठी बालाजी गरड, ग्रा. पं. सदस्य गजानन नलावडे, सुनील शेळके, पंकज शिंदे, अनिल कोरे, अंगणवाडी पर्यवेक्षिका मोहिते, संतोष मुळे, जगन्नाथ होवाळ व ग्रामस्थ उपस्थित होते.