शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक ! काठोकाठ भरलेल्या काळेवाडी तलावाच्या भरावाला भेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 19:08 IST

Kalewadi lake News Usmanbad परंडा तालुक्यातील कोळेवाडी येथे साधारपणे १९७८ मध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून साठवण तलाव उभारण्यात आला आहे.  

ठळक मुद्देभरावाची दुरूस्ती करण्यासोबतच सांडवा फोडून पाण्याचा विसर्गतलावाच्या भरावाला सुमारे ५० मिटर लांबीपर्यंत अचानक भेग पडली.

उस्मानाबाद : परंडा तालुक्यातील काळेवाडी तलावाच्या भरावाला सुमारे ५० मिटर लांबीपर्यंत अचानक भेग पडली. हा तलाव काठोकाठ भरला असल्याने संभाव्य धोका ओखळून लघु पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिवसभर तळ ठोकून भरावाची दुरूस्ती करण्यासोबतच सांडवा फोडून पाण्याचा विसर्ग सुरू केला.

परंडा तालुक्यातील कोळेवाडी येथे साधारपणे १९७८ मध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून साठवण तलाव उभारण्यात आला आहे.  मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने हा तलाव काठोकाठ भरला आहे. असे असतानाच प्रकल्पाच्या भरावाला ५० मिटर लांब भेग पडली. ही भेग सोमवारी १ फुट रूंद व तीन मिटर खोल होती. ही माहिती मिळताच जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळताच कार्यकारी अभियंता कदम, उपअभियंता सुनिल बारसकर यांनी लवाजम्यासह प्रकल्पस्थळी धाव घेत जेसीबीच्या सहाय्याने सांडवा फोडला. या माध्यमातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर ट्रॅक्टर, जेसीबीद्वारे भराव दुरूस्तीचे कामही हाती घेतले. त्यामुळे तुर्तास हा धोका टळल्याचे लघु पाटबंधारे विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. 

भराव दुरूस्ती हाती घेतली आहेसुरूवातीला भरावाला पडलेली भेग फार लांब नव्हती. परंतु, सोमवारी सकाळी अचानक ही भेग ५० मिटर लांब झाली. रूंदीही वाढत गेली. त्यामुळे कार्यकारी अभियंता कदम यांच्या निर्देशाप्रमाणे प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू केला. तसेच भराव दुरूस्तीही हाती घेतली आहे.- सुनील बारसकर, उपअभियंता, परंडा.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादWaterपाणीDamधरण