अध्यक्षस्थानी तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश जे. डी. वडणे होते. प्रास्ताविक दिवाणी न्यायाधीश आय. एम. नाईकवाडी यांनी केले. सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर के. के. खोमणे यांनी तरुणांची व्यसनाधीनता ही देशासाठी मारक आसल्याचे मत व्यक्त केले. विधिज्ञ एस. बी. हुंबे यांनी भारतीय सज्ञान कायदा तसेच क्रिमिनॉलॉजी या विषयावर माहिती दिली. यानंतर न्या. जे. डी. वडणे यांनी युवा स्तर हा ऊर्जेचा स्रोत आसल्याचे सांगत तरुणांनी समाज माध्यमाचा योग्य व माफक वापर करावा, असे आवाहन केले. यावेळी विद्यार्थ्यांसह भूम विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. अजित मोटे, उपअध्यक्ष ॲड. मकरंद सोन्ने, सचिव ॲड. अमित जाधव तसेच वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एस. बी. चंदनशीव, प्राचार्य एस. डी. बोराडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन ॲड. एस. आर. शाळू यांनी केले तर अभार प्रा. जी. सी. काळे यांनी मानले.
240821\2100img-20210824-wa0085.jpg
भूम फोटो जागतिक युवा साक्षरता दिना निमित्त मार्गदर्शन करताना जिल्हा न्यायाधिश जे डी वडणे सोबत इतर मान्यावर