‘इफेक्टिव कम्युनिकेशन’ विषयावर कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:14 IST2021-02-05T08:14:16+5:302021-02-05T08:14:16+5:30
तुळजापूर : येथील श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात इफेक्टिव कम्युनिकेशन विषयावर प्राध्यापकांसाठी कार्यशाळा घेण्यात आली. प्रारंभी उस्मानाबाद आकाशवाणी केंद्राचे प्रमुख ...

‘इफेक्टिव कम्युनिकेशन’ विषयावर कार्यशाळा
तुळजापूर : येथील श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात इफेक्टिव कम्युनिकेशन विषयावर प्राध्यापकांसाठी कार्यशाळा घेण्यात आली. प्रारंभी उस्मानाबाद आकाशवाणी केंद्राचे प्रमुख उन्मेश वाळिंबे, कार्यक्रमाधिकारी दौलत निपाणीकर, प्राचार्य डॉ. शेखर जगदे, उपप्राचार्य प्रा. रवी मुदकना यांच्या हस्ते तुळजाभवानी प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
उन्मेश वाळिंबे यांनी या कार्यशाळेंतर्गत ‘निघालो घेऊनी, शब्दांची पालखी’ या विषयावर प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. त्यात चांगला संवाद साधण्यासाठी ‘शब्द’ महत्त्वाचे असतात. यासाठी वाचन करणे गरजेचे आहे. संवादासाठी उच्चार चांगले असावेत, यासाठी बोलण्या अगोदर ऐकणे, अवकाश असणे गरजेचे आहे, प्रतिक्रियेवर प्रतिसाद दिला पाहिजे. शब्दांची निवड ही महत्त्वाची आहे. शब्दांच्या निवडीमुळे सुसंवाद चांगला होतो. यामुळे सकारात्मकता निर्माण होते, असे सांगितले. यावेळी त्यांनी उपस्थित प्राध्यापकांना संक्षिप्त निबंध लिहिण्यास सांगितले. या निबंधातील त्रुटी व वाचण्याची पद्धत ही कशी महत्त्वाची आहे हे त्यांनी प्रत्यक्ष सांगितले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जगदे यांनी तर आभार प्रा. विश्वास पतंगे यांनी मानले. कार्यशाळेसाठी प्रा. संतोष एकदंते, प्रा. प्रिया सुरवसे, प्रबंधिका सुजाता कोळी यांनी पुढाकार घेतला.
(कॅप्शन)
तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘इफेक्टिव कम्युनिकेशन’ विषयावर प्राध्यापकांसाठी कार्यशाळा घेण्यात आली. याच्या उद्घाटनप्रसंगी आकाशवाणी केंद्रप्रमुख वाळिंबे, प्राचार्य जगदे, माजी प्राचार्य पेरगाड, प्रबंधिका कोळी, प्रा. सुरवसे आदी.