कामगारांनी घातला ठेकेदार कंपनीस गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:01 IST2021-03-04T05:01:25+5:302021-03-04T05:01:25+5:30

उस्मानाबाद -तलावाच्या कामावरील यंत्र तसेच इतर साहित्य परस्पर विक्री करून चक्क कामगारांनी ठेकेदार कंपनीस गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समाेर ...

The workers hired the contractor company | कामगारांनी घातला ठेकेदार कंपनीस गंडा

कामगारांनी घातला ठेकेदार कंपनीस गंडा

उस्मानाबाद -तलावाच्या कामावरील यंत्र तसेच इतर साहित्य परस्पर विक्री करून चक्क कामगारांनी ठेकेदार कंपनीस गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. यानंतर कंपनीकडून देण्यात आलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील दिंडेगाव शिवारातील लघुपाटबंधारे तलावाचे बांधकाम व्हीएस काळे आणि कंपनीच्या माध्यमातून करण्यात येत हाेते. काही तांत्रिक कारणांमुळे हे काम बंद पडले हाेते. कंपनीने कामावरील यंत्रे, वाहने आदी साहित्य काटगाव येथील दामाेदर बनसाेडे यांच्या शेतात ठेवले हाेते. दरम्यान, १५ डिसेंबर २०१९ ते १५ सप्टेंबर २०२० या कालावधीत कंपनीचे कामगार विजय व संदीप ज्ञानदेव काळे (रा. माळशीरस) या दाेघा बंधुंनी यंत्र, वाहनासह इतर साहित्याची परस्पर विल्हेवाट लावून फसवणूक केली. ही बाब समाेर आल्यानंतर कंपनीच्या संचालिका मंगल काळे (रा. पुणे) यांनी २ मार्च राेजी नळदुर्ग पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून संबंधित दाेघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

Web Title: The workers hired the contractor company