कोरोनाला रोखण्यासाठी एकजुटीने काम करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:31 IST2021-04-06T04:31:18+5:302021-04-06T04:31:18+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात कोरोना रुग्णांना शासकीय पातळीवर विविध ठिकाणी सेवा दिल्या जात आहेत. ...

कोरोनाला रोखण्यासाठी एकजुटीने काम करावे
उस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात कोरोना रुग्णांना शासकीय पातळीवर विविध ठिकाणी सेवा दिल्या जात आहेत. कोरोनाच्या आपत्तीमध्ये रुग्णांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांना वेळेवर मदत करण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य समिती सभापती धनंजय सावंत यांनी व्यक्त केले.
सोमवारी उपाध्यक्षांच्या दालनात आरोग्य विषय समितीची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस शोभा तोरखडे, मोरे, नंदकुमार कदम, विक्रम शहापूरकर, अभियंता शिंदे, अर्जुन लाकाळ, आदींची उपस्थिती होती.
सावंत म्हणाले, कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी स्वत:बरोबर इतरांची काळजी घेणे गरजेचे आहे. काम नसताना विनाकारण बाहेर फिरू नये, मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले. त्याचबरोबर जिल्ह्यातील वाढती कोविड रुग्ण संख्या व करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, इतर आरोग्यविषयक बाबींचा आढावाही यावेळी त्यांनी घेतला.