कर्मचाऱ्यांनी केले काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:32 IST2021-04-21T04:32:13+5:302021-04-21T04:32:13+5:30
उगवणक्षमता तपासणी करण्याचे आवाहन भूम : सोयाबीनची पेरणीपूर्व उगवणक्षमतेची तपासणी करूनच पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात ...

कर्मचाऱ्यांनी केले काम बंद आंदोलन
उगवणक्षमता तपासणी करण्याचे आवाहन
भूम : सोयाबीनची पेरणीपूर्व उगवणक्षमतेची तपासणी करूनच पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. मागील वर्षी स्वत:च्या शेतातील चांगले सोयाबीन शेतकऱ्यांनी पुढील खरिपात म्हणजेच, येणाऱ्या हंगामासाठी राखून ठेवले आहे. परंतु, सध्या बाजारात सोयाबीनचा भाव तेजीत असल्याने शेतकरी हे सोयाबीन विकण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना पेरणीसाठी सोयाबीन शिल्लक ठेवण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. मागील वर्षी कंपनीच्या बियाण्यांबाबत अनेक तक्रारी होत्या. मात्र, उगवण क्षमता तपासून घरचे बियाणे वापरलेल्या शेतकऱ्यांना फायदा झाल्याचेही कृषी विभागाने म्हटले आहे.
समितीचे गठन
तुळजापूर : तालुक्यातील जळकोट येथे ‘माझे गाव, कोरोनामुक्त गाव’ उपक्रमांतर्गत गाव स्तरावर पर्यवेक्षक समिती गठित करण्यात आली आहे. या समितीत जि. प. मुलांची शाळेचे मुख्याध्यापक जगन्नाथ शिंदे, विठ्ठल गिरी आदींचा समावेश आहे.
जयंती साजरी
उस्मानाबाद : येथील भीमनिर्णायक युवाच्या वतीने चक्रवर्ती प्रियदर्शी सम्राट अशोक यांची जयंती दिनी प्रतिमा पूजन करून साजरी करण्यात आली. यावेळी भीमनिर्णायकचे संस्थापक अध्यक्ष सचिन दिलपाक व संस्थापक सदस्य संतोष बनसोडे, सूरज सुरते उपस्थित होते.