गट-तट बाजुला ठेवून काम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:22 IST2021-07-21T04:22:18+5:302021-07-21T04:22:18+5:30

पारगाव : शिवसैनिकांनी गट-तट बाजुला ठेवून पक्ष संघटन वाढीसाठी एकत्रित काम करावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख गौतम लटके यांनी ...

Work side by side | गट-तट बाजुला ठेवून काम करा

गट-तट बाजुला ठेवून काम करा

पारगाव : शिवसैनिकांनी गट-तट बाजुला ठेवून पक्ष संघटन वाढीसाठी एकत्रित काम करावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख गौतम लटके यांनी केले.

पारगाव येथे शिवसंपर्क अभियानांतर्गत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी शिवसैनिकांनी सभासद नोंदणीवर भर द्यावा. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार राबवित असलेल्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम शिवसैनिकांनी करावे. त्याचा लाभ नागरिकांना मिळवून द्यावा, असे आवाहन लटके यांनी केले.

यावेळी तालुका उपप्रमुख विकास तळेकर यांनी पंचायत समिती सदस्या सविता तळेकर यांना ठरलेले सभापतीपद लवकर द्यावे, अशी मागणी केली. बैठकीला शिवसेना तालुकाप्रमुख ॲड. सत्यवान गपाट, युवासेना जिल्हाप्रमुख डॉ. चेतन बोराडे, शिवसेना वैद्यकीय कक्ष जिल्हा समन्वयक ॲड. कानिफनाथ कानतोडे, युवासेना तालुकाप्रमुख बालाजी लाखे, जिल्हा सरचिटणीस ॲड. महेश आखाडे, जिल्हा परिषद सदस्य उद्धव साळवी, माजी उपजिल्हा प्रमुख रवींद्र धर्माधिकारी, तात्यासाहेब बहिर, बाबा घोलप, स्वप्नील कोकाटे, अमोल गायकवाड, तात्या गायकवाड, राजाभाऊ कोळी, बाबा हारे, प्रदीप कोकणे आदी उपस्थित होते.

190721\2427214-img-20210719-wa0040.jpg

जिल्हाप्रमुख गौतम लटके मार्गदर्शन करताना.

Web Title: Work side by side

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.