(फोटो - बीबीसी १५)
उस्मानाबाद : येथील बौध्द स्मशानभूमीतील निवारा शेडवरती स्लॅब टाकण्यास सुरुवात झाली. नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या हस्ते स्लॅबच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले.
बाैध्द स्मशानभूमीत पाणी, वीज, दहन शेड तसेच निवारा शेडची सुविधा नव्हती. त्यामुळे समाजबांधवांना प्रचंड गैरसाेयीचा सामना करवा लागत हाेता. ही बाब नगरसेवक सिद्धार्थ बनसाेडे यांनी नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांच्याकडे मांडली. या मागण्या विचारात घेऊन नगराध्यक्षांनी त्यास तातडीने मंजुरी दिली. सध्या ही कामे सुरू आहेत. यापैकीच निवारा शेडच्या स्लॅबच्या कामाचे उद्घाटन नुकतेच पार पडले. यावेळी नगरसेवक बनसाेडे यांनी रमाई नगरात उजनी पाणीपुरवठा याेजनेची पाईपलाईन नसल्याने नागरिकांना गैरसाेयीचा सामना करवा लागत असल्याचे नमूद केले. त्यावर नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी हेही काम तातडीने मार्गी लावले जाईल, अशी ग्वाही दिली. याप्रसंगी अभियंता अनिल गरड, अंगुल बनसोडे, बाबासाहेब बनसोडे, देवानंद एडके, सोमनाथ गायकवाड, संजय गजधने, सचिन वाघमारे, विनायक गायकवाड, शहाजी बनसोडे, धम्मपाल शिंगाडे यांची प्रमुख उपस्थिती हाेती.