हनुमान मंदिराच्या सभामंडपाचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:29 IST2021-03-08T04:29:47+5:302021-03-08T04:29:47+5:30
उस्मानाबाद : शहरातील विकासनगर येथील हनुमान मंदिरासमोर आ. कैलास पाटील यांच्या आमदार स्थानिक निधीमधून सभामंडपाचे काम हाती घेण्यात आले ...

हनुमान मंदिराच्या सभामंडपाचे काम सुरू
उस्मानाबाद : शहरातील विकासनगर येथील हनुमान मंदिरासमोर आ. कैलास पाटील यांच्या आमदार स्थानिक निधीमधून सभामंडपाचे काम हाती घेण्यात आले आहे. याचे उद्घाटन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ. कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर आदींच्या हस्ते झाले. याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख सतीशकुमार सोमाणी, नगरसेवक तथा गटनेते सोमनाथ गुरव, नगरसेवक बाळासाहेब काकडे, रवी वाघमारे, माजी नगरसेवक रोहित निंबाळकर, माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, भीमा जाधव, चेतन वाटवडे, अभिजित पतंगे, सुभाष वर्तक, राज भालेकर, सुरेश भालेराव, देशमुख नाना, रूपदासमामा, डॉ. पाकले, संदीप शिंदे, उद्धव टेकाळे, सुभाष पाटोळे, गणेश राजेनिंबाळकर, गोविंद कोळगे, सौरभ शेळके, अजय सुपेकर, नितीन राठोड, नितीन इंगळे, ज्योतिबा ढेरे आदी उपस्थित होते.