मंगरूळात पार पडला महिला मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:32 IST2021-03-10T04:32:27+5:302021-03-10T04:32:27+5:30

मंगरुळ : कळंब तालुक्यातील मंगरुळ येथे भारतीय स्टेट बॅंक व उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने व महिला जागतिक दिनाच्या निमित्ताने ...

Women's meet held in Mangrul | मंगरूळात पार पडला महिला मेळावा

मंगरूळात पार पडला महिला मेळावा

मंगरुळ : कळंब तालुक्यातील मंगरुळ येथे भारतीय स्टेट बॅंक व उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने व महिला जागतिक दिनाच्या निमित्ताने महिला बचत गटाचा मेळावा पार पडला. यावेळी ९५ उमेद महिला गटांना ३८ लाख रुपये कर्ज मंजुरी आदेशपत्र शाखा व्यवस्थापक गजानन पोपळे व वरिष्ठ मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. प्रास्ताविक प्रतिक गायकवाड यांनी केले. यावेळी शाखा व्यवस्थापक गजानन पोपळे, मुख्य प्रबंधक भास्कर मनी, गोपाळ कुलकर्णी, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद कुसनेपार, तेजस कुलकर्णी, विकास ताटे, सूर्यकांत खेडकर, सरपंच केवळबाई शिंदे, अच्युतराव पाटील, माया शिंदे, उषा कांबळे, अनिता मुंडे, मंदाकिनी बनसोडे, बँक कर्मचारी वाघमारे, वैभव गायकवाड, अच्युत घाडगे आदींसह बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.

Web Title: Women's meet held in Mangrul