शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

संतापजनक! सोनोग्राफी विभागाची किल्ली हरवल्याने गरोदर मातांची तीन तास गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 17:48 IST

उस्मानाबाद येथील स्त्री रूग्णालयातील सोनोग्राफी विभागाच्या कार्यालयाची चावी हरवल्याचा प्रकार आज सकाळी घडला. चावी हरवल्याने तब्बल तीन तास गरोदर मातांना कार्यालयाबाहेर ताटकळत थांबावे लागले

ठळक मुद्देउस्मानाबादेतील स्त्री रूग्णालयात जिल्ह्यातीलच नव्हे तर बार्शी तालुक्यातीलही गरोदर महिला प्रसुतीसाठी येतात़ रूग्णालयातील खाटांची संख्या ६० असली तरी दाखल होणाऱ्या महिला रूग्णांची संख्या सरासरी १३० च्या आसपास असते़

उस्मानाबाद : येथील स्त्री रूग्णालयातील सोनोग्राफी विभागाच्या कार्यालयाची चावी हरवल्याचा प्रकार आज सकाळी घडला. चावी हरवल्याने तब्बल तीन तास गरोदर मातांना कार्यालयाबाहेर ताटकळत थांबावे लागले़ विशेषत: प्रसुतीसाठी आलेल्या काही मातांना खासगी रूग्णालयात नेऊन सोनोग्राफी करण्याची वेळ नातेवाईकांवर आली. चावी सापडत नसल्याने अखेर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कुलूप तोडून सोनोग्राफी विभागाचे कामकाज सुरू करण्यात आले.

उस्मानाबादेतील स्त्री रूग्णालयात जिल्ह्यातीलच नव्हे तर बार्शी तालुक्यातीलही गरोदर महिला प्रसुतीसाठी येतात. रूग्णालयातील खाटांची संख्या ६० असली तरी दाखल होणाऱ्या महिला रूग्णांची संख्या सरासरी १३० च्या आसपास असते़ परिणामी कधी अपुऱ्या खाटामुळे तर कधी पाण्याअभावी महिला रूग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागतो़ विशेषत: प्रसुतीवेळी लागणारे अनेक साहित्यही बाहेरून आणण्याची वेळ नातेवाईकांवर येत आहे़ आज सकाळी नेहमीप्रमाणे अनेक गरोदर माता सोनोग्राफीसाठी स्त्री रूग्णालयात आल्या होत्या़ सोनोग्राफी कार्यालयाबाहेर तासभर थांबल्यानंतर कार्यालय उघडले जात नसल्याने नातेवाईकांनी कर्मचाऱ्यांकडे विचारपूस करण्यास सुरूवात केली़ त्यावेळी चावी सापडत नसल्याचे सांगण्यात आले़ सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आलेल्या गरोदर माता व नातेवाईक तब्बल ११़३० पर्यंत ताटकाळत थांबले होते़ त्यावेळी काही महिलांना ‘उद्या या’ असा सल्ला देऊन परत पाठविण्यात आले़ काहीजण चावी सापडेल! या आशेवर तेथेच थांबून होते़ तर काहींनी खासगी रूग्णालयात जावून सोनोग्राफी करून घेणे पसंत केले़

शेवटी कुलूप तोडावे लागले साधारणत: १२ वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधीक्षकांना चावी सापडत नसल्याची माहिती देण्यात आली़ त्यांच्या सूचनेनुसार एका कर्मचाऱ्याने कार्यालयाचे कुलूप तोडले़ त्यानंतर उपस्थित महिलांची सोनोग्राफी करण्याचे कामकाज सुरू झाले़ दरम्यान, गरोदरपणामध्ये मातांनी काळजी घ्यावी, यासाठी आरोग्य विभागाकडूनच वेळोवेळी जनजागृती केली जाते़ मात्र, कार्यालयाच्या चावीची काळजी संबंधित कर्मचाऱ्याने न घेतल्याने गुरूवारी सकाळी गरोदर मातांना रूग्णालयात ताटकाळत थांबून शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागला़

सूचना दिल्या आहेतवैद्यकीय अधीक्षक आऱपी़वाघमारे म्हणाले, सोनोग्राफी विभागाची चावी सापडत नसल्याची माहिती मिळाल्यानंतर कुलूप तोडून कामकाज सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत़ सोनोग्राफी विभागासाठी नवीन कुलूप आणण्यात येणार असून, महिला रूग्णांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होवू नये, यासाठी कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत़

टॅग्स :hospitalहॉस्पिटलState Governmentराज्य सरकारWomenमहिलाmedicineऔषधंdoctorडॉक्टर