बाबासारखे पोलीस, डॉक्टर होणार का; मुले म्हणतात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:33 IST2021-05-18T04:33:42+5:302021-05-18T04:33:42+5:30

अनेक मुलांनी आपल्या वडिलांबद्दल समाधान व्यक्त केले. मात्र, आपले भवितव्य घडविताना या क्षेत्रात आपण काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट ...

Will there be a policeman like Baba, a doctor; The children say no | बाबासारखे पोलीस, डॉक्टर होणार का; मुले म्हणतात नाही

बाबासारखे पोलीस, डॉक्टर होणार का; मुले म्हणतात नाही

अनेक मुलांनी आपल्या वडिलांबद्दल समाधान व्यक्त केले. मात्र, आपले भवितव्य घडविताना या क्षेत्रात आपण काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय राजकीय इच्छाशक्तीने या क्षेत्रात आपण काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय राजकीय इच्छाशक्तीने या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विविध सुविधा देण्यासोबतच रिक्त पदांची भरती करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे मर्यादित मनुष्यबळाचा ताण कमी होईल.

माझी आई डॉक्टर असल्यामुळे पूर्णवेळ तिला रुग्णसेवेसाठी द्यावा लागतो. तिचे काम उत्तम आहे. परंतु, कोरोना काळात तिची व्यस्तता पाहून मला पुढील काळात डाॅक्टरऐवजी दुसऱ्या क्षेत्रात करिअर करायची इच्छा आहे.

अंजली हरिभक्त

सध्याच्या साथरोग आजारात डॉक्टर कमी पडत आहे. माझ्या वडिलांची सेवा पाहिली तर मला त्यांचा अभिमान वाटतो. वैद्यकीय क्षेत्रात करिअर चांगले आहे. पण कुटुंबास वेळ देता येत नाही. त्यामुळे इतर क्षेत्र निवडणार आहे.

प्रतीक्षा गोसावी

माझ्या वडिलांचे काम समाजाप्रती दायित्व निभावणारे आहे. बाबाकडे पाहिल्यानंतर अभिमान वाटतो. त्यांचे काम नि:स्वार्थ स्वरुपाचे आहे. रुग्ण सेवा केल्यानंतर त्यांना रुग्णांचे आशीर्वाद मिळतात. त्यामुळे भविष्यात आरोग्य क्षेत्रात काम करणार आहे.

प्रीतेक्ष पांचाळ

माझे वडील पूर्णपणे पोलीस खात्यात झोकून देऊन काम करत असतात. कुटुंबाचा गाडा हाकताना आईचे योगदानही महत्त्वाचे आहे. मला पोलिसांबद्दल आदर आहे. मात्र मी पोलीस क्षेत्राऐवजी इतर क्षेत्रात काम करणार आहे.

सूरज बारगजे

मला पोलिसांबद्दल अभिमान आहे. लोकांना मदत करताना मी दररोज पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांना पाहतो. मानवसेवेपेक्षा दुसरी सेवा कोणतीच नाही. मी स्वत: भविष्यामध्ये पोलीस क्षेत्रात नोकरी करायचे ठरवले आहे.

सौरभ केंडे

कोरोना काळात डाॅक्टरांना कधी १२ तर आणीबाणीच्या काळात २४ तास ड्युटी करावी लागत आहे. अशा स्थितीत त्यांना आपल्या कुटुंबास वेळ देता येत नाही. मुलांच्या जडण घडणीवर परिणाम होता. त्यामुळे मुलेही नैरात्य, निद्रानाश अशा समस्येने ग्रासले जातात. मानसिक ताण टाळण्यासाठी योगा व मेडिटेशन करणे गरजेचे आहे.

डॉ. राजेश नरवडे, मानसोपचार तज्ज्ञ

उस्मानाबाद

Web Title: Will there be a policeman like Baba, a doctor; The children say no